झाडं विदर्भात नको, मराठवाड्यात लावा, मुख्यमंत्र्यांच्या काकूंचा मुनगंटीवारांना घरचा आहेर

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याने घरचा आहेर दिला आहे. विदर्भात झाडं लावू नका, मराठवाड्यात लावा, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.   राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आढावा बैठका …

झाडं विदर्भात नको, मराठवाड्यात लावा, मुख्यमंत्र्यांच्या काकूंचा मुनगंटीवारांना घरचा आहेर

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याने घरचा आहेर दिला आहे. विदर्भात झाडं लावू नका, मराठवाड्यात लावा, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आढावा बैठका घेत आहेत. पण त्यांच्याच पक्षातून त्यांच्या या मोहिमेला खो मिळाला आहे. आणि हा खो दिला आहे त्यांच्याच पक्षाच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी.

“विदर्भात आधीच 35 टक्क्यांच्यावर जंगल आहे आणि या जंगलामुळे आमचे सिंचन प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे विदर्भात झाडं लावू नका, तर मराठवाड्यात लावा.” अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी मांडली आहे.

तसेच, त्यांनी वृक्षारोपणासाठी वनविभागाने खोदलेले खड्डे बुजवण्याचे आवाहनी शोभाताईंनी शेतकऱ्यांना केले आहे.

विशेष म्हणजे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि शोभाताई फडणवीस यांच्यातील संघर्ष फार जुना आहे आणि शोभाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. त्यामुळे या नव्या वादाचाही चर्चा सध्या विदर्भात रंगली आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *