AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणी साठा

पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खुशखबर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणी साठा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 27, 2019 | 12:28 PM
Share

मुंबई : पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake ) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाव परिसरात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वैतरणा, तानसासह इतर सर्व तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा (mumbai water supply lake) जमा झाला आहे.

सर्व तलावांमध्ये वार्षिक साठ्याच्या तुलनेत सुमारे 99 टक्के एवढा पाणीसाठा आहे. मुंबईकरांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची संक्रात (Mumbai Water cutting) यावर्षी टळली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी 3800 दशलक्ष अर्थात 380 कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. 26 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजेपर्यंत यासर्व तलावांमध्ये 14 लाख 30 हजार 224 दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

मुंबईकरांची वार्षिक तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असते. त्या तुलनेत यासर्व तलावांमध्ये 98.82 टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

दरम्यान, यंदा मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं आणि तलाव भरले आहेत. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव परिसरातही यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता मिठली आहे.

तलावांतील पाणीसाठा

  • अप्पर वैतरण : 2,23,190 दशलक्ष लिटर
  • मोडक सागर : 1,27,001 दशलक्ष लिटर
  • तानसा : 1,43,416 दशलक्ष लिटर
  • मध्य वैतरणा : 1,90,535 दशलक्ष लिटर
  • भातसा : 7,18,532 दशलक्ष लिटर
  • विहार : 27,698 दशलक्ष लिटर
  • तुळशी : 8,046 दशलक्ष लिटर

एकूण : 14,30,224 दशलक्ष लिटर

Follow Us
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांच्या अर्जावर... थेट कोर्टापर्यंत गेलं प्रकरण
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!