Lenovo A6, K10 नोट आणि Z6 प्रो स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स

स्पर्धेत परतण्यासाठी Lenovo ने A6, K10 नोट आणि Z6 प्रो स्मार्टफोन लाँच केले (Lenovo Launched A6, K10 note and  Z6 pro). हा Lenovo चा यावर्षीचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट आहे. कंपनीने बेस मॉडेल, मीड रेंज आणि फ्लॅगशीप अशा तीनही प्रकारांवर फोकस करत हे स्मार्टफोन लाँच केले.

Lenovo A6, K10 नोट आणि Z6 प्रो स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स

मुंबई : एकेकाळी भारताच्या टॉप मोबाईल कंपन्यांमध्ये असलेली Lenovo ही कंपनी गेल्या काही काळापासून मागे पडली आहे. स्पर्धेत परतण्यासाठी Lenovo ने A6, K10 नोट आणि Z6 प्रो स्मार्टफोन लाँच केले (Lenovo Launched A6, K10 note and  Z6 pro). हा Lenovo चा यावर्षीचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट आहे. कंपनीने बेस मॉडेल, मीड रेंज आणि फ्लॅगशीप अशा तीनही प्रकारांवर फोकस करत हे स्मार्टफोन लाँच केले.

नव्या स्मार्टफोन्सची किंमत

Lenovo K10 नोट : Lenovo K10 ला कंपनीने Redmi, Realme आणि Oppo च्या मीड रेंज स्मार्टफोनना टक्कर देण्यासाठी लाँच केलं आहे. K10 प्रोच्या 4GB आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

Lenovo A6 : कंपनीने A6 स्मार्टफोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज दिलं आहे. हा स्मार्टफोन युझर्ससाठी फक्त 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन तुम्ही 11 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता.

Lenovo Z6 प्रो : कंपनीने फ्लॅगशीप लेव्हलवर Z6 प्रो स्मार्टफोन लाँच केला आहे. Z6 मध्ये कंपनीने युझर्सला 8GB रॅम आणि 128G स्टोरेजचं ऑप्शनही दिलं आहे. या स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपये आहे. पण, लाँच ऑफर्सदरम्यान युझर्सला या स्मार्टफोनवर 2,200 रुपयांचं कॅशबॅक मिळेल.

K10, A6 आणि Z6 चे फीचर्स

Lenovo K10 नोट : K10 मध्ये कंपनीने 6.3 इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले दिला आहे. हा वॉटर नॉच डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. K10 च्या बॅक पॅनलमध्ये ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आहे, तर 8 मेगापिक्सलचा दुसरा लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी 4050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Lenovo A6 : A6 स्मार्टफोनमध्ये Lenovo ने 6.09 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Lenovo Z6 प्रो : Z6 प्रो स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.39 इंचाचा फुल्ल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगनच्या सर्वात चांगल्या 855 चिपसेटचा वापर केला आहे. त्याशिवाय याच्या बॅक पॅनलवर कंपनीने 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 4 लेन्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा आहे.

संबंधित बातम्या :

ट्विटरच्या CEO चे अकाऊंट हॅक, मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

Google Play Store मधून ‘हे’ अॅप हटवलं, लाखो युजर्सवर मालवेअर अटॅक

Honor चा नवा रेकॉर्ड, एका महिन्यात 9X सीरिजच्या 30 लाख स्मार्टफोनची विक्री

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *