ट्विटरच्या CEO चे अकाऊंट हॅक, मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

ट्विटरचे सहसंस्थापक (CEO) जॅक डॉर्सी (Twitter CEO Jack Dorsey) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक (Jack Dorsey Hacked) झाले आहे. त्यांच्या (Twitter CEO Jack Dorsey) ट्विटर अकाऊंटवर अनेक वर्णभेदी ट्विट करण्यात आले.

ट्विटरच्या CEO चे अकाऊंट हॅक, मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

Jack Dorsey Hacked न्यूयॉर्क : ट्विटरचे सहसंस्थापक (CEO) जॅक डॉर्सी (Twitter CEO Jack Dorsey) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक (Jack Dorsey Hacked) झाले आहे. त्यांच्या (Twitter CEO Jack Dorsey) ट्विटर अकाऊंटवर अनेक वर्णभेदी ट्विट ((racist tweets) करण्यात आले. Chuckling Squad या ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. मात्र ट्विटरच्या सीईओचे अकाऊंट अशाप्रकारे हॅक (Hack) झाल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजून 35 मिनिटांनी जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर जवळपास 15 मिनीटे त्यांच्या ट्विटरवरुन वर्णभेदी, धमकी आणि जबरदस्ती (anti-Semitic and racist tweets) अशाप्रकारचे ट्विट करण्यात आले.

याशिवाय ट्विटरच्या मुख्यालयात बॉम्ब असल्याचे खोटं वृत्त त्यांनी ट्विट केलं. अशाप्रकारच्या ट्विटला इतर हॅकर्सनेही रीट्विट केलं होते. अशाप्रकारच्या आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांनी N हे इंग्रजी लेटर आणि होलोकॉस्ट (Holocaust) टाकले होते. यानंतर काही वेळाने हे आक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्यात आले.

विशेष ट्विटरच्या कम्युनिकेशन टीमने (Twitter’s communications team) जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. तसेच आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

जॅक डॉर्सी यांचे ट्विटरवर 40 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. Chuckling Squad या हॅकिंग ग्रुपने आतापर्यंत अभिनेत्यांसह अनेक कलाकारांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहे. मात्र आता खुद्द ट्विटरच्या सीईओचे अकाऊंट हॅक झाल्यामुळे ट्विटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *