पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांना फोन, तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन चर्चा केली आहे (Narendra Modi Amit Shah call Sharad Pawar).

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांना फोन, तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन चर्चा केली आहे (Narendra Modi Amit Shah call Sharad Pawar). यावेळी तिन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूच्या संकटावर फोनवरुन चर्चा केली. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची संख्या सातत्याने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

अमित शाह यांनी शरद पवार यांना फोन करुन राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेत उपाय योजनांवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना नियंत्रणासाठी अनेक महत्त्वाच्या सुचनाही केल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 690 वर गेला आहे. तर राज्यातील ‘कोरोना’बळींची संख्या 36 वर पोहोचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 472 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – एका रुग्णाचा मृत्यू – 5 एप्रिल

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई396863741279
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
44303689
नवी मुंबई मनपा26738061
कल्याण डोंबिवली मनपा13189125
उल्हासनगर मनपा3316
भिवंडी निजामपूर मनपा134116
मिरा भाईंदर मनपा69915713
पालघर 14413
वसई विरार मनपा87410527
रायगड609518
पनवेल मनपा49921
नाशिक (शहर +ग्रामीण)38728
मालेगाव मनपा74858
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14016
जळगाव 616172
नंदूरबार 353
सोलापूर8974170
सातारा523316
कोल्हापूर 45724
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15011465
जालना1250
हिंगोली 14910
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7330
बीड470
नांदेड 1116
अकोला 5841428
अमरावती 22616
यवतमाळ 130221
बुलडाणा 6283
वाशिम 80
नागपूर5748410
वर्धा 1201
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59015
एकूण67655293292286

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 36 वर

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

‘कोरोना’सोबत राज्यासमोर ‘हे’ प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला

वर्ध्यात मजुरांची कामावरुन हकालपट्टी, कंपनीला 2 लाखांचा दंड

Narendra Modi Amit Shah call Sharad Pawar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *