सलामीवीर म्हणून पहिलीच कसोटी, रोहितचं दोन्ही डावात शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावातील 176 धावांच्या खेळीनंतर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक (127) ठोकलं.

सलामीवीर म्हणून पहिलीच कसोटी, रोहितचं दोन्ही डावात शतक
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 4:12 PM

विशाखापट्टणम : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma records) कसोटीत पहिल्यांदाच सलामीला येत नवे विक्रम नावावर केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावातील 176 धावांच्या खेळीनंतर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक (127) ठोकलं. सुनील गावकर, राहुल द्रविड, विराट कोहली या दिग्गजांच्या रांगेत (Rohit Sharma records) आता रोहितचाही समावेश झाला आहे.

सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 176 धावा रचल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही सलामीला येत शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत उभं केलं. दुसऱ्या डावात 127 धावा करुन रोहित बाद झाला.

षटकांचा विक्रम

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटचं रुपांतर टी-20 क्रिकेटमध्ये केलं. या कसोटीत (Rohit Sharma records) त्याने एकूण 13 षटकार ठोकले. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1996 मध्ये वसीम अक्रमने सर्वाधिक 12 षटकार ठोकले होते.

दरम्यान, एका कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत रोहितने (Rohit Sharma records) सर्व भारतीयांना मागे टाकलंय. आतापर्यंत हा विक्रम नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नावावर होता. त्यांनी 1994 ला लखनौच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध 9 षटकार ठोकले होते. त्यानंतर मॅथ्यू हेडन, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावावरही अनुक्रमे 7 षटकार ठोकण्याचा विक्रम होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए मैदानावर सुरु आहे. नाणेफेक (Rohit Sharma records) जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 7 बाद 502 धावा करुन डाव घोषित केला. तर दक्षिण आफ्रिकेला 431 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला दुसऱ्या डावात केवळ 7 धावा करता आल्या आणि तो बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी मोठी भागीदारी (Rohit Sharma records) रचण्याचा प्रयत्न केला. पण पुजारा 81 धावा करुन माघारी परतला. यानंतर रोहितने त्याचं दुसऱ्या डावातील शतक पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिकेने हलाखीच्या परिस्थितीत डाव सांभाळला

पहिल्या डावात भारताला 71 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपला. आफ्रिकेच्या या धावसंख्येत सर्वात मोठं योगदान डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉक यांनी दिलं. एल्गरने 287 चेंडूत 160 धावा केल्या, ज्यात 18 चौकारांसह चार षटकारांचाही समावेश होता.

डी कॉकने 16 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 163 चेंडूत 111 धावा केल्या. यामुळे सहाव्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी झाली आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सुस्थितीत पोहोचला. या दोघांशिवाय कर्णधार फफ डू प्लेसिसनेही 55 धावांचं योगदान दिलं आणि एल्गरसोबत पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली.

भारतीय गोलंदाजांची कमाल, तरीही रोखण्यात अपयश

रविचंद्रन अश्विनने कसोटीत कमबॅक करत संधीचं सोनं केलं. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेतल्या. याशिवाय रवींद्र जाडेजाने दोन आणि ईशांत शर्माने एका फलंदाजाला बाद केलं. मात्र भारताने 502 धावा करुनही मोठी आघाडी मिळवता आली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.