VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर

कोलंबो : श्रीलंकेतील कोलंबोसह इतर शहरात 21 एप्रिल रोजी झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 321 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 भारतीयांचाही समावेश आहे. या स्फोटामुळे श्रीलंकेसह जगभरात एकच खळबळ उडाली होती. जगभरातून बॉम्बस्फोटाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या स्फोटानंतर श्रीलंकन तपासयंत्रणांनी शोधमोहीम वेगवान केली आहे. या स्फोटाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. VIDEO :  […]

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

कोलंबो : श्रीलंकेतील कोलंबोसह इतर शहरात 21 एप्रिल रोजी झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 321 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 भारतीयांचाही समावेश आहे. या स्फोटामुळे श्रीलंकेसह जगभरात एकच खळबळ उडाली होती. जगभरातून बॉम्बस्फोटाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या स्फोटानंतर श्रीलंकन तपासयंत्रणांनी शोधमोहीम वेगवान केली आहे. या स्फोटाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO : 

याचदरम्यान सेंट सेबेस्टियन चर्चमधील एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, यातील एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद मानल्या जात आहेत.

CCTV : चर्चमधील संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत कैद

श्रीलंकेने स्थानिक मुस्लीम संघटनांना या स्फोटासाठी जबाबदार ठरवले असून, स्फोटामागील मास्टरमाईंडना शोधण्यासाठी श्रीलंकन सरकारने इतर देशांनाही मदतीचे आवाहन केले आहे. नॅशनल तौहिद जमात (एनटीजे) या मुस्लीम संघटनेने हा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा श्रीलंकन सरकारने केला आहे.

रविवारी, 21 एप्रिल रोजी श्रीलंकेतील कोलंबो आणि इतर शहरात आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. यात आतापर्यंत 321 जणांचा मृत्यू, तर 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील तीन चर्च आणि तीन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. सिनमन ग्रँड, शांग्रिला, किंग्सबरी या हॉटेलमध्ये आणि कोलंबो, नेगोंबो आणि बट्टिकालोआ येथील चर्चामध्ये स्फोट झाले.

सोमवारी, 22 एप्रिल रोजी कोलंबोत अँथनी चर्चजवळ बॉम्ब निकामी करतानाही स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याच चर्चामध्ये रविवारी स्फोट घडवण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.