Monkeypox | 20 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 200 केसेस , WHO ने सांगितले व्हायरस कसा पसरतो!

| Updated on: May 29, 2022 | 8:33 AM

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये मंकीपॉक्स हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. दररोज नवनवीन खुलासे हे मंकीपॉक्सबद्दल केले जात आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग स्पेनमध्ये खूप जात होतो आहे. यासंदर्भात स्पेनच्या प्रशासनाने सांगितले की, मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 98 वर पोहोचली आहे.

Monkeypox | 20 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 200 केसेस , WHO ने सांगितले व्हायरस कसा पसरतो!
Follow us on

मुंबई : मंकीपॉक्स (Monkeypox) या साथीच्या रोगाने जवळपास 20 देशांमध्ये पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. धोक्याची घंटा म्हणजे या देशांमध्ये 200 पेक्षा अधिक रूग्णे मंकीपॉक्सची सापडली आहेत. मंकीपॉक्स संदर्भात आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने एक दिलासादायक बातमी दिली असून मंकीपॉक्सवर नियंत्रित (Controlled) मिळवले जाऊ शकते, असे सांगण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य (Health) संस्थेने पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्याच्या साथीच्या रोगाची सुरुवात कशी झाली यासंबंधीचे अनेक प्रश्न अद्याप सापडलेली नाहीत.

ऑस्ट्रेलियामध्ये मंकीपॉक्सच्या केसेसमध्ये वाढ

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये मंकीपॉक्स हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. दररोज नवनवीन खुलासे हे मंकीपॉक्सबद्दल केले जात आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग स्पेनमध्ये खूप जात होतो आहे. यासंदर्भात स्पेनच्या प्रशासनाने सांगितले की, मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 98 वर पोहोचली आहे, त्यात एका महिलेचा समावेश आहे. ब्रिटन, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इतर देशांतील डॉक्टरांचा अजूनही असा विश्वास आहे की हा संसर्ग समलैंगिक किंवा उभयलिंगी पुरुष किंवा पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना होतो.

हे सुद्धा वाचा

मंकीपॉक्स एक व्हायरल इन्फेक्शन

मंकीपॉक्स एक व्हायरल इन्फेक्शन आहे. 1970 साली या आजाराचे संक्रमण माणसांनाही होत असल्याचे समोर आले. मंकीपॉक्सचे संक्रमण डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून पसरते. रुग्णाचे कपडे, पांघरुणाला स्पर्श केला तरी हा आजार पसरण्याची शक्यता आहे. माकडं, उंदीर अशा जनावरांना मारल्याने किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स होण्याची शक्यता अधिक असते. मंकीपॉक्सची लक्षणे संक्रमणानंतर 21 व्या दिवसांपर्यंत दिसतात. सुरुवातीची लक्षणे ही फ्ल्यू सारखी सर्व लक्षणे असतात.