Health tips : ‘या’ 3 कारणांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, आजच बदला आपल्या सवयी

| Updated on: Mar 19, 2022 | 9:15 AM

जर तुम्हाला कॅन्सर टाळायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. विविध संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी शरीरात हळूहळू कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.

Health tips : या’ 3 कारणांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, आजच बदला आपल्या सवयी
Image Credit source: TV 9
Follow us on

कॅन्सर (Cancer) हा एक घातक आजार आहे. कॅन्सरचे विविध प्रकार आणि अनेक संभाव्य कारणे आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. जन्मजात (Congenital) कारणे रोखणे अवघड असले तरी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यांसारख्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवून कॅन्सर टाळता येतो. संशोधनात असे दिसून आले आहे की 80 ते 90 टक्के घातक ट्यूमर बाह्य घटकांशी संबंधित असतात. जर तुम्हाला कॅन्सर टाळायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. याचे कारण असे की, विविध संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, आपण रोज खात असलेल्या काही गोष्टी शरीरात हळूहळू कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. काही पदार्थ टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकतात त्यामुळे लठ्ठपणाही (Obesity) निर्माण होत असतो. बर्‍याच पदार्थांमध्ये कार्सिनोजेन्स असतात, जे हानिकारक पदार्थ असतात ज्यात कर्करोग होण्याची क्षमता असते. जाणून घेऊया संशोधनात असे कोणते पदार्थ आढळून आले आहेत, ज्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा

लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होतात, त्यामुळे निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे. सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा यासारख्या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि ही समस्या भविष्यात कर्करोगाला कारणीभूत ठरते.

फास्ट फूडमुळे शरीरात कर्करोग

जंक फूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या फास्ट फूडमध्ये विषारी रसायने असतात, ज्यामुळे कर्करोग आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. एका अभ्यासानुसार फास्ट फूडमध्ये ‘फॅथलेट्स’ असतात. हे एक संयुग आहे जे प्लास्टिकला लवचिक बनवते. हे रासायनिक तत्व कर्करोग, वंध्यत्व, यकृत खराब होणे आणि दम्याचा झटका यांसह अनेक आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे.

अल्कोहोल हे कर्करोगाचे प्रमुख कारण

अनेकजण अधूनमधून दारू पिण्याचा आनंद घेतात. दारुचे सेवन शक्य तितके कमी करावे असे डॉक्टर सुचवतात. पोट, स्तन, यकृत, तोंड, घसा आणि अन्ननलिका इत्यादींसह अनेक प्रकारचे कर्करोग अल्कोहोलच्या सेवनाशी संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही अल्कोहोलचे सेवन करता तेव्हा तुमचे यकृत अल्कोहोल ‘एसीटाल्डिहाइड’मध्ये मोडते.

संबंधित बातम्या

Corona Update : केरळमध्ये 247 तर महाराष्ट्रात 171 नवे कोरोनाग्रस्त; केंद्राच्या सतर्कतेच्या सूचना

रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोणता Face pack लावाल? उत्तर इथे मिळेल!

Teeth | मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल