Teeth | मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल

Teeth | मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल
दातांची काळजी घेण्यासारखी वापरा फळं
Image Credit source: TV9 Marathi

चमकदार दातांसाठी अनेक घरगुती उपाय योजना केल्या जाउ शकतात. बाहेरील कृत्रिम प्रोडक्टचा वापर केल्यास यातून दुष्परिणाम होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातुलनेत घरगुती उपाय योजना दुष्परिणामांपासून सुरक्षा देतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 18, 2022 | 5:56 PM

स्वच्छ व पांढरेशुभ्र दात (white teeth) सर्वांनाच हवे असतात. अनेकदा मळकट, पिवळे दात आपल्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक प्रभाव निर्माण करीत असतात. त्यामुळे आपली इच्छा असूनही आपण कुणाशी मनमोकळे हसू शकत नाहीत. चमकदार दात असतील तर आपल्या व्यक्तित्वाची (personality) एक वेगळी छाप पडत असते. परंतु अनेकदा आपला आहार, (Diet) चुकीच्या सवयी, व्यसन आदी विविध गोष्टींमुळे पिवळे दात, तोंडाची दुर्गंधी आदी विविध समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. अनेक जणांची दातं सलग नसून ती काही वेळा मागेपुढेही असतात. यामुळे त्यांची नीट स्वच्छता करणेही अवघड होत असते. त्यामुळे परिणामी दातांचा रंग पिवळा-तपकिरी होत असतो. परंतु या लेखात आपण अशा काही फळांचा आढावा घेणार आहोत, ज्यांच्या वापराने आपले दात अगदी मोत्यासारखे चमकण्यास मदत होणार आहे.

1) केळी

केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जात असते. आयुर्वेदात केळीचे अनेक फायदे सांगितले गेले आहे. केळीने दात निरोगी आणि चमकदार बनवता येतात. यासाठी केळीला रोजच्या आहारातील एक भाग बनवायला हवा. केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मॅंगनीज दातांवरील घाण काढून टाकतात, व दात निरोगी व स्वच्छ बनवतात.

2) स्ट्रॉबेरी

असं कुणीही नसेल ज्याला स्ट्रॉबेरी हे फळ आवडत नसेल. अनेकांना विविध घटकांमध्ये स्ट्रॉबेरी टाकून त्याचा आस्वाद घ्यायला आवडत असतो. स्ट्रॉबेरीचे दातांसाठी दोन फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याचे नियमित सेवन केल्यास दात आतून मजबूत होतात. दुसरे म्हणजे ते दातांवर चोळल्याने त्यांचा पिवळसरपणा दूर होतो.

3) सफरचंद

सफरचंद दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी एक जालीम उपाय आहे. खूप कमी लोकांना याबाबतची माहिती आहे. यामध्ये असलेले मॅलिक अॅसिड दातांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, या अॅसिडमुळे तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते, ज्यामुळे दात चमकदार होऊ शकतात.

4) संत्री

अनेकांच्या शरीरात ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असते. या कमतरतेमुळे त्यांच्या हिरड्यांमधून रक्त येते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तोंडात पायोरिया होऊ शकतो. अशा परिस्थितीत संत्र्याचे सेवन करा, कारण ते ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. त्याचबरोबर दातांवर घासल्याने ते चमकदार होतात.

5) क्रॅनबेरी

असे म्हटले जाते, की हे फळ तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. दातांना किडण्यापासून वाचवण्यासोबतच श्वासाची दुर्गंधी देखील रोखते. तुम्ही क्रॅनबेरीचा रस बनवत त्याचे सेवन करू शकता. यातून दातांनाही अनेक फायदे मिळतील.

संबंधित बातम्या :

World Sleep Day : अपुरी झोप देते अनेक आजारांना निमंत्रण, मानसिक तणावही वाढतो

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडुलिंब आणि हळद एकत्र मिक्स करून खा! जाणून घ्या फायदे

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें