कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर

कोरोनाचे संक्रमण आणि वायरस ची संख्या कमी व्हावी यासाठी संशोधका कडून वेगवेगळे संशोधन केले जात आहे. नुकतीच एक गोष्ट समोर आलेली आहे की, गायीच्या दुधामुळे कोरोनाचे संक्रमण भविष्यात रोखण्यासाठी मदत होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया संशोधनामागील गोष्ट!

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर
Cow MilkImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 9:04 PM

मुंबईः आयुर्वेदामध्ये गायीच्या दुधाचे अनेक फायदेही सांगण्यात आलेले आहे परंतु नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झाले आहे की, गायीचे दूध कोरोना पासून संरक्षण मिळवण्यासाठी देखील कार्य करत आहे. हा दावा मिश‍िगन यूनिवर्सिटी (University of Michigan) चे संशोधकांनी केलेला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, गायीचे दूध (Cow Milk) दोन पद्धतीने कार्य करू शकते. पहिले हे आपल्याला कोररोना म्हणजेच covid-19 संक्रमणापासून वाचवू शकते आणि दुसरे म्हणजे कोरोना चे संक्रमण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वायरस ची होणारी वाढ देखील या गायीच्या दुधामुळे रोखू शकते. चला तर मग जाणून घेऊया या दुधा मध्ये असे काय आहे हे व्हायरस संक्रमानाला रोखू शकते त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी…

संशोधकांच्या मते गायीच्या दुधामध्ये बोविन लेक्‍टोफेरिन (Bovine Lactoferrin) प्रोटीन असते, ज्यात व्हायरसला थांबविण्याची क्षमता असते. हे प्रोटीन आपल्या शरीरातील covid-19 ला शरीरात वाढ होऊ देत नाही. हे विशेष प्रकारचे प्रोटीन अनेक व्हायरस किटाणू जीवाणूपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते.

व्हायरल डिफेन्स मेकॅनिझम

मुख्य संशोधक जोनाथन सेक्‍सटन यांचे म्हणणे आहे की, संशोधन दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने सिद्ध झाले की, गायीच्या दुधामध्ये उपलब्ध असणारे हे विशेष प्रकारचे प्रोटीन कोरोना व्हायरसला ब्लॉक करून देते परिणामी व्हायरस आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. हे एका प्रकारचे व्हायरल डिफेन्स मेकॅनिझम आहे.

संक्रमणाची गंभीरता कमी

संशोधकांचे असे म्हणणे आहे की,या विशेष प्रकारच्या प्रोटीन ओरली देऊ शकतो म्हणजे आपण तोंडाने हे प्रोटीन सेवन करू शकतो यामुळे संक्रमणाची गंभीरता कमी केली जाऊ शकते.डेयरी साइंस जर्नल मध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार गायीच्या दुधामध्ये उपलब्ध असणाऱ्या या प्रोटीनच्या मदतीने या प्रकारचे आजार भविष्यात रोखता येऊ शकतील आणि त्याचबरोबर त्वरित उपचार देखील करता येईल.

आजार रोखण्यासाठी काही उपचारांची गरज

सेक्‍सटन यांचे म्हणणे असे आहे की ,अशा काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार रोखण्यासाठी काही उपचारांची गरज आहे. हल्ली उपचार करणे खूपच महाग झालेले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये हे प्रोटीन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रोटीन च्या मदतीने लोकांना लवकर बरे करता येईल त्याचबरोबर ज्या व्यक्तींना नवीन आजार उद्भवत आहे अशा ठिकाणी हे प्रोटीन वापरणे लाभदायक ठरणार आहे.

संबंधित बातम्या

IPL 2022: कशी आहे Gujarat Titans ची Playing 11, विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या फलंदाज, गोलंदाजांबद्दल जाणून घ्या सर्वकाही

अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका, विरोधकांना टीका करु द्या, Shambhuraj Desai यांचं टीकास्त्र

Video: नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holiसाठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.