IPL 2022: कशी आहे Gujarat Titans ची Playing 11, विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या फलंदाज, गोलंदाजांबद्दल जाणून घ्या सर्वकाही

आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये (IPL 2022) आणखी एक नवीन संघ डेब्यू करणार आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans)हा पहिलाच सीजन आहे.

IPL 2022: कशी आहे Gujarat Titans ची Playing 11, विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या फलंदाज, गोलंदाजांबद्दल जाणून घ्या सर्वकाही
आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कॅप्टन, पंतला आरामImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 8:46 PM

मुंबई: आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये (IPL 2022) आणखी एक नवीन संघ डेब्यू करणार आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans)हा पहिलाच सीजन आहे. राशिद खान-शुभमन गिलसारखे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यांना ड्राफ्ट प्लेयर म्हणून आधीच संघात घेण्यात आलं होतं. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडले आहेत, जे स्वबळावर विजय मिळवून देऊ शकतात. टीमममध्ये युवा आणि नामांकित खेळाडू आहेत. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सचा पहिला सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहेत. संघ नवीन असल्यामुळे चाहत्यांना देखील बरीच उत्सुक्ता आहे. एकापेक्षाएक मॅच विनर खेळाडू असल्यामुळे गुजरात टायटन्स प्लेइंग इलेवनमध्ये कुठल्या खेळाडूंना संधी देईल? त्याबद्दल जाणून घेऊया.

गुजरात टायटन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे हार्दिक पंड्याचा फिटनेस. हार्दिक पंडयाने कालच NCA मध्ये फिटनेस चाचणी पास केली. हार्दिकने यो-यो टेस्ट पास केलीच, पण धारदार गोलंदाजीही करुन दाखवली. हार्दिकच्या फिटनेसबद्दल अनेकांनी शंका-कुशंका व्यक्त केल्या होत्या. हार्दिक पूर्णपणे फिट असणं हा गुजरात टायटन्ससाठी मोठा दिलासा आहे.

गुजरात टायटन्समध्ये कोण फलंदाज आहेत?

शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड गुजरात टायटन्सकडून सलामीला उतरु शकतात. वेड ऑस्ट्रेलियन विकेटकीपर आहे. तो आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. टायटन्सने जेसन रॉयला विकत घेतलं होतं. पण त्याने आयपीएलमधून माघार घेतली. त्याशिवाय डेविड मिलर, गुरकीरत मान सुद्धा फलंदाजी करु शकतात.

गुजरात टायटन्समध्ये ऑलराऊंडर कोण आहेत?

स्वत: कॅप्टन हार्दिक पंड्या ऑलराऊंडर आहे. त्याशिवाय विजय शंकर, राहुल तेवतिया सुद्धा ऑलराऊंडरची भूमिका बजावू शकतात.

गुजरात टायटन्समध्ये गोलंदाज कोण आहेत?

राशिद खान गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याशिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीला बळ दईल. मोहम्मद शमी आणि लोकी फर्ग्युसन या टीमची वेगवान गोलंदाजी अधिक धारदार बनवतील.

गुजरातची संभाव्य Playing 11: शुभमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, गुरकीरत सिंह मान, डेविड मिलर, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि लोकी फर्गयुसन.

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.