AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किडनी डिटॉक्ससाठी ‘हे’ पदार्थ ठरतील उपयोगी, आजच आहारात करा समावेश

किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम करते. किडनीच्या नैसर्गिक कार्याला सपोर्ट करण्यासाठी आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करता येतो. हे कोणते पदार्थ आहेत ते येथे जाणून घ्या

किडनी डिटॉक्ससाठी 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी, आजच आहारात करा समावेश
kidney detox
| Edited By: | Updated on: Sep 26, 2026 | 8:55 PM
Share

किडनी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे काम करते. रक्त गाळून त्यातील वेस्ट मटेरियल बाहेर काढण्यासोबतच शरीरातील फ्लूइडचे संतुलन राखण्यातही तिची भूमिका असते. मात्र रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण किडनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित जीवनशैली किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. यासोबतच असे काही पदार्थ आहेत जे किडनीच्या कार्याला मदत करतात, शरीराला हायड्रेट ठेवतात आणि शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला मदत करतात. तुमच्या संतुलित आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा.

क्रॅनबेरी

क्रॅनबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाचे नैसर्गिक संयुग असते. हे मूत्रमार्गाच्या आतील भागाला चिकटणाऱ्या बॅक्टेरियांचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. या संसर्गावर योग्य उपचार न झाल्यास त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. याशिवाय क्रॅनबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. किडनीच्या आरोग्यासाठी ताज्या किंवा ड्राइड क्रॅनबेरीचा आहारात समावेश करता येतो.

लिंबू पाणी

किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आहारात अधूनमधून लिंबूपाण्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. लिंबूमध्ये असलेले सायट्रेट काही लोकांमध्ये किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढते आणि किडनीला शरीरातील वेस्ट मटेरियल बाहेर काढण्यास मदत होते. मात्र लिंबू पाण्यात अतिरिक्त साखर घालणे टाळावे.

बीटरूट

बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि बीटाइनसारखे वनस्पतीजन्य घटक मुबलक प्रमाणात असतात. यातील पोषक घटक निरोगी रक्ताभिसरणाला मदत करण्यासोबतच शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी बीटरूटचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. कारण त्यामध्ये नैसर्गिकरित्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सफरचंद

रोजच्या आहारात सफरचंदाचा समावेश करणे हा आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. सफरचंदातून केवळ फायबरच मिळत नाही, तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटकही असतात. हे घटक हृदय आणि मेटाबॉलिक आरोग्याला सपोर्ट करू शकतात, ज्याचा किडनीच्या आरोग्याशीही संबंध आहे. सफरचंदातील सोल्युबल फायबर निरोगी कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते.

लसूण

लसूणमध्ये सल्फरयुक्त संयुगे आढळतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात चव वाढवण्यासाठी लसणाचा समावेश करता येतो. मात्र किडनीच्या आरोग्यासाठी आहार घेताना मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लसूण वापरताना पदार्थात अतिरिक्त मीठ जास्त प्रमाणात घालणे टाळा.

कोबी

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. इतर अनेक भाज्यांच्या तुलनेत कोबीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ती किडनी-फ्रेंडली आहाराचा भाग ठरू शकते. कोबीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. कोबी हलकी वाफवून, सूपमध्ये किंवा कमी तेलात परतून खाता येते.

टरबूज

टरबूज मध्ये सुमारे ९० टक्के पाणी असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे चांगले फळ मानले जाते. किडनीच्या आरोग्यासाठी पुरेसे हायड्रेशन महत्त्वाचे असल्याने आहारात कलिंगडाचा समावेश करता येतो. यामध्ये लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सीसारखे अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र किडनीचा जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही. लागू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?