
केळी ही अशा फळांच्या यादीत येते जी बहुतेक लोकांना खायला आवडतात. केळी हे एक निरोगी आणि पौष्टिक फळ आहे ज्यामुळे ते जगभरात जास्त आवडलं आणि खाल्लं जातं. केळीचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहेत. तरी या व्यक्तींनी केळीचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे किंवा त्यांनी ते पूर्णपणे टाळले पाहिजे.
ज्या लोकांना केळीची ॲलर्जी आहे त्यांनी केळी पूर्णपणे टाळावी. केळीची ॲलर्जी फार सामान्य नाही, परंतु यामुळे पित्त, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि ॲनाफिलेक्सिस सारखी गंभीर लक्षणे उद्भवू शकतात.
केळीमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील जास्त असणारी साखरेची पातळी किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन करू नये. जर त्यांना खायचे असेल तर त्यांनी जास्त पिकलेली केळी देखील टाळावी, ज्यात जास्त साखर असते.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे मूत्रपिंडाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते ज्यांना त्यांच्या शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढण्यात अडचण येते. अशा लोकांनी केळीचे सेवन करू नये.
ज्या लोकांना वारंवार पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेची तक्रार असते त्यांनी केळीचे सेवन टाळावे. केळी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याऐवजी ती वाढविण्याचे काम करू शकते.
दम्याच्या रुग्णांनीही केळी खाऊ नये, कारण त्यांची समस्या आणखी वाढू शकते. ज्या लोकांना दमा आहे त्यांनी चुकूनही केळी खाऊ नये. .