डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आता सर्वात मोठा धक्का, नोकऱ्या धोक्यात, थेट आदेशच काढला..
पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते, ही भेट अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरली असून, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा मोठा फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते, यादरम्यान भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं रशियासोबत अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. पुतिन यांच्या भारत भेटीकडे अमेरिकेचं लक्ष लागलं होतं. पुतिन यांची ही भारत भेट अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. दरम्यान रशिया भारताला तेलाचा पुरवठा सुरूच ठेवेल असं आश्वासन देखील या भेटीमध्ये पुतिन यांनी भारताला दिलं आहे. दुसरीकडे या भेटीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच जळफळाट झाल्याचं पहायला मिळत आहे. पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम हा अमेरिकेतील लाखो भारतीय नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांवर होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या इमिग्रेशन सिस्टममध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे, या संदर्भात अमेरिकेच्या सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) कडून घोषणा करण्यात आली आहे. या नव्या बदलानुसार आता एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेशन डॉक्युमेंट्सचा कमाल वैधता कालावधी कमी करण्यात येणार आहे. आता याचा मोठा परिणाम हा हजारो भारतीय लोकांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर होणार आहे. सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसनं हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच संभाव्य धोके कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. आता या नव्या नियमानुसार अमेरिकेमध्ये ज्याला काम करण्याची इच्छा आहे, किंवा ज्याने अमेरिकेकडे तशी परवानगी मागितली आहे, अशा व्यक्तीची आता कडक आणि वारंवार तपासणी होणार आहे. ज्यामुळे जर एखाद्या व्यक्तीपासून देशाला धोका असेल तर त्याची माहिती आधीच मिळेल असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
दरम्यान प्रशासनाच्या वतीनं असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, वॉशिंग्टनमध्ये ज्याने नॅशनल गार्डच्या सौनिकावर हल्ला केला होता, त्याला मागच्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात एन्ट्री मिळाली होती. आता या घटनेनंतर सिस्टममध्ये बदल करणं खूप गरजेचं झालं आहे. दरम्यान याचा सर्वाधिक परिणाम हा एच-1 बी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात भारतीय नागरिक येतात. त्यामुळे आता हा नवा कायदा अमेरिकेतील भारतीय लोकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
