Skin care: स्वीमिंग केल्यानंतर त्वचा टॅनिन होण्यापासून वाचवायची असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करायला हव्यात !

| Updated on: Mar 14, 2022 | 11:29 PM

आपल्यापैकी अनेक जण स्विमिंग ( swimming) करतात. प्रत्येकाला स्विमिंग करणे आवडत असते परंतु स्विमिंग करताना आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा स्विमिंग पूल मधल्या पाण्यामुळे आपल्या त्वचेला टँनिंग सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Skin care: स्वीमिंग केल्यानंतर त्वचा टॅनिन होण्यापासून वाचवायची असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करायला हव्यात !
Follow us on

आपली त्वचा ( skin care) सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर आपली त्वचा व्यवस्थित व स्वच्छ असेल तर आपल्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. हल्ली प्रत्येक जण व त्या संदर्भातील वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहे.त्वचा स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण बाजारामध्ये उपलब्ध असणारे उत्पादन देखील वापरतात परंतु बाजारातील उत्पादन वापरल्यामुळे बहुतेक वेळा आपली स्किन खराब होऊन जाते, म्हणूनच आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील करणे गरजेचे आहे. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना त्वचेच्या वेगळ्या समस्या उद्भवत असतात, जसे की चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स चेहऱ्यावर सुरकुत्या जाणवणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. हल्ली वातावरणामध्ये बद्दल देखील झालेले आहे आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण दिवसभर बाहेर काम करत असताना चेहऱ्यावर धूळ साचते. चेहरा तेलकट होतो, चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होतात आणि यामुळे सुद्धा आपली उपचार खराब होण्याची शक्यता जास्त असते. आपल्यापैकी अनेक जण करत स्विमिंग करत असतात. प्रत्येकाला स्विमिंग करणे आवडत असते आणि म्हणूनच स्विमिंग करत असताना त्वचा नेमकी कशी सुरक्षित राहील, त्वचेवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायला हवी. बहुतेक वेळा स्विमिंग पुल च्या पाण्यामध्ये रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात. या रासायनिक पदार्थांचा देखील आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच या लेखामध्ये स्विमिंग (swimming) केल्यानंतर व स्विमिंग करण्यापूर्वी आपल्या त्वचेची काळजी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे जेणेकरून चेहऱ्यावर व त्वचावर टॅनिन (tanning) निर्माण होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल महत्त्वाची माहिती.

सनस्क्रीन

सूर्याच्या किरणांमुळे आणि उन्हाळ्यामुळे वातावरणामध्ये भरपूर बदल होत असतात. वातावरणामध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे गरमी देखील होते आणि या गरमी मुळे आपली बहुतेक वेळा त्वचा खराब होते. सूर्यांच्या अतिरिक्त किरणांपासून वाचायचे असेल तर अशा वेळी सन स्क्रीन लावणे आवश्यक आहे. घरातून बाहेर निघते वेळी किंवा स्विमिंग करण्यापूर्वी जर तुम्ही सन स्क्रीन लावत असाल तर तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे सन स्क्रीन सहजरीत्या उपलब्ध होते. काही वॉटरप्रुफ देखील सन स्क्रीन असतात त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते.

चेहरा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा

भलेही तुम्ही घरातून सनस्क्रीन क्रीम लावून बाहेर पडला असाल तरीही तुम्ही तुमचे शरीर व्यवस्थित रित्या झाकून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. जेव्हा तुम्ही स्विमिंग करून घरी परत याल तेव्हा तुमचा चेहरा कपड्याने किंवा स्काफने झाकायला विसरू नका.

स्वीमिंग केल्यानंतर देखील अंघोळ करा

अनेकदा लोक स्विमिंग केल्यानंतर अंघोळ करत नाही. जर तुम्ही सुद्धा असे करता असाल तर ही सवय अत्यंत चुकीची आहे. स्विमिंग करण्याआधी आणि स्विमिंग केल्यानंतर आंघोळ करणे अत्यंत गरजेचे आहे.

मॉइस्चराइजर क्रीम लावणे

स्वीमिंग केल्यानंतर सनस्क्रीन लावण्याआधी स्किन वर मॉइस्चराइजर जरूर लावायला हवे. मॉइस्चराइजर मुळे स्किन गरमी मध्ये आपली त्वचा हायड्रेट राहते. या कारणामुळे देखील तुमची त्वचा टॅनिन पासून सुरक्षित राहते.

बटाट्याचा रस

स्विमिंग केल्यामुळे तुम्हाला सन बर्न किंवा टॅनिन सारखी समस्या उद्भवत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. उन्हामुळे शरीराची होणारी जळजळ दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील एक पदार्थ वापरायचा आहे तो पदार्थ म्हणजे बटाटा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी बटाट्याचा रस तयार करायचा आहे. बटाट्याचा रस आपल्या त्वचेवर लावल्याने आपल्याला उन्हामुळे होणारी जळजळ थांबवता येते व नैसर्गिकरीत्या त्वचा देखील सुरक्षित राहते.

इतर बातम्या

औरंगाबादः जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत ICU, काम प्रगतीपथावर, काय असतील सुविधा?

वजन जास्त, वेळ कमी? चिंता नको, सोप्या पद्धतींनी करा Weight Loss