AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाने गिळला चमचा, 8 सेंटीमीटरची ही वस्तू घशात अडकल्याने इमर्जन्सी ऑपरेशन केले, अन् असे वाचवले प्राण

एका तरुणाने चुकून चमचा गिळल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. हा चमचा त्यांच्या छोट्या आतड्यात वरच्या बाजूला अडकला होता. डॉक्टरांनी मोठ्या कुशलतेने या रुग्णाच्या पोटातून चमचा काढण्यात यश मिळवले असून त्याला जीवदान दिले आहे.

तरुणाने गिळला चमचा, 8 सेंटीमीटरची ही वस्तू घशात अडकल्याने इमर्जन्सी ऑपरेशन केले, अन् असे वाचवले प्राण
| Updated on: Jun 17, 2025 | 5:32 PM
Share

दिल्लीच्या शालीमार बाग येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून 8 सेंटीमीटर लांबीचा चमचा यशस्वीपणे काढला आहे. हे जटील ऑपरेशन केवळ अर्धा तासात पूर्ण झाले आहे. रुग्णाने चुकीने हा चमचा गिळला होता. या रुग्णाला वाचविण्यात यश आले आहे. हा चमचा रुग्णाच्या वरच्या आतड्यात अडकला होता. हा चमचा वेळेत निघाला नसता तर रुग्णाच्या जीवाला धोका पोहचला असता.

दिल्लीच्या एका 30 वर्षांच्या तरुणाने चुकून चमचा गिळला होता. या चमचा त्याच्या वरील आतड्यात अडकला होता. या तरुणाला तातडीने दिल्लीतील मल्टी सुपर-स्पेशलिटी हॉस्पिटल आणण्यात आले. तेथे त्याची सुरुवातीची तपासणी केली आणि त्याला शालीमार येथील फोर्टीस रुग्णालयात इमर्जन्सी रेफर करण्यात आले. रुग्णाला फोर्टीसमध्ये आणले तेव्हा त्याची स्थिती स्थिर होती. एक्सरे नंतर चमचा त्याच्या पोटात अडकला असल्याचे स्पष्ट झाले.

फोर्टीस रुग्णालयात त्याच्या पोटाचे अनेक एक्स -रे सह तत्काल डायग्नोस्टीक इमेजिंग काढण्यात आली. त्यातून कळले की त्याच्या वरच्या आतड्यात वरच्या भागात धातूचा चमचा अडकलेला आहे. रुग्णाला एनेस्थेशिया देऊन अपर गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपी करण्यात आली. सर्जिकल टीमने फोरसेपच्या मदतीने सावधानतापूर्वक रुग्णाच्या पोटातून हा चमचा काढला. त्यानंतर या रुग्णाला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

आव्हानात्मक केस

या काळात या तरुणाची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. त्यानंतर त्याला अखेर डिस्चार्ज देण्यात आला.दिल्लीतील शालीमार बाग येथील फोर्टिस हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ संचालक आणि एचओडी डॉ. रमेश गर्ग यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या चमूने ही अवघड शस्रक्रिया ३० मिनिटांत केली. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीने त्याचा चमचा बाहेर काढण्यात आला. दुसऱ्याच दिवशी रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले. या प्रकरणाची माहिती देताना डॉ. रमेश म्हणाले की, ही एक अतिशय दुर्मिळ आणि आव्हानात्मक केस होती. याच रुग्णाला वाचवण्यात आम्हाला यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

आत कुठेही जखम झाली नाही हे विशेष

चमचा सारखा धातूचा पदार्थ अडकल्याने कॉम्पिकेशन वाढले होते. खासकरुन ती वस्तू छोट्या आतड्याच्या वरच्या भागात अडकली असेल तर हे धोकादायक ठरु शकते. अशावेळी डायग्नोसिस आणि इंटरव्हेंशन खूपच महत्वाचे असते. आमच्या टीमने एनेस्थेसियासह इमर्जन्सी अपर जीआय एंडोस्कोपीद्वारे आणि खूपच अचूकपणे हा आठ सेंटीमीटर लांबीचा चमचा काढला आणि विशेष म्हणजे आत कुठेही जखम झालेली नाही हे विशेष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.