Weight Lose Tips : ‘या’ चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!

| Updated on: Apr 01, 2022 | 4:14 PM

Weight Lose Tips : काही फळांचा आपल्या आहार समावेश केल्याने आपलं वजन कमी होतं. फळातून पोषक घटक मिळत असल्याने वजन कमी होऊन देखील थकवा जाणवत नाही.

Weight Lose Tips : या चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!
असे घटवा आपले वजन
Image Credit source: Apples grapefruit berries kiwi this 4 Fruits helpful for To lose weight
Follow us on

मुंबई : सध्या वाढतं वजन (Weight Gaining) ही एक गंभीर समस्या आहे. याचा सामना कसा करावा हे अनेकांना कळत नाही, अश्यात वजन घटवण्यासाठी (Weight Lose) नेमकं काय करावं हे लक्षात येत नाही. फळं खाणं आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानलं जातं. तज्ज्ञही तसा सल्ला देतात. काही फळांचा आपल्या आहार समावेश केल्याने आपलं वजन कमी होतं. फळातून पोषक घटक मिळत असल्याने वजन कमी होऊन देखील थकवा जाणवत नाही. पण नेमक्या कोणत्या फळांचा आहारात समावेश केल्याने वजन कमी होईल, याविषयी जाणून घेऊयात.

ग्रेपफ्रुट –

संत्र्यासारखं दिसणारं हे आहे ग्रेपफ्रुट. ग्रेपफ्रुट खाल्ल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं.जर तुम्ही हे फळ या आधी खाल्लं नसेल तर आजच हे फळ घरी आणा आणि त्याचा आहारात समावेश करा.

सफरचंद

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा असा सल्ला दिला जातो. हा खरं तर योग्य आहे. सफरचंदांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.एका सफरचंदामध्ये 110 कॅलरीज असतात आणि ते शरीराला अँटिऑक्सिडंट्स प्रदान करतात. त्याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहते. वजन कमी होतं शिवाय तुमचं आरोग्यही सुदृढ राहातं

बेरीज्

बेरी खाऊनही तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. जर तुम्ही तुमच्या आहारात अर्धा कप बेरीचा समावेश केला तर ते तुम्हाला 42 कॅलरीज् पुरवतात. शिवाय शरीराला 12 टक्के व्हिटॅमिन-सी आणि मॅंगनीज मिळतात. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

किवी

तुम्ही किवीनेही तुमचे वजन कमी करू शकता. चिकूसारखं दिसणारं हे फळ खूप पौष्टिक आहे. या फळाचा दररोज आहारात समावेश केल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. आरोग्य उत्तम राहातं शिवाय तुमचं वजनही घटतं.

संबंधित बातम्या

तुमच्या मनात असतं एक आणि बोलता भलतंच? सावधान! तुम्हाला असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

Health Tips | त्वचेशी संबंधित समस्यांवर ‘आईस क्यूब्स’ ठरेल परिणामकारक

रक्तदाब व मधुमेहींसाठी हे पदार्थ वरदानापेक्षा कमी नाहीत