
मासिक पाळी म्हटंल की दरवेळेस चांगल्या प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि टॅम्पोन्स वापरण्यावर भर असतो. ज्या महिलांना टॅम्पोन्समुळे आरामादायी वाटत नाही तर त्या स्त्रिया शक्यतो सॅनिटरी पॅड्सच वापरण योग्य समजतात. पण यांसोबत अजून एक गोष्ट आहे जी सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सव्यतिरिक्त उपलब्ध आहे आणि ती म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. बऱ्याच स्त्रिया वापरतही असतीस. असे अनेकांचें म्हणणे आहे की, सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सच्या तुलनेत कप जास्त सुरक्षित मानले जातात.
दहा वर्षांपर्यंत कप वापरू शकता: मेन्स्ट्रुअल कप हे टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोगं साधन आहे. हा कप सिलिकॉन किंवा रबरापासून बनवलेला असतो. तसेच हा कप लवचिकही असतो. एक कप जवळपास तुम्ही 10 वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येणं शक्य असल्याचेही म्हटलं जातं. तसेच मेन्स्ट्रुअल कप हे पर्यावरणास अनुकूल असतात. सॅनिटरी पॅडचं विघटन होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.
menstrual cups
आठ तासांपर्यंत आरामदायी : मेन्स्ट्रुअल कप आठ तासांसाठी लीकेजपासून संरक्षण देतो. करतो. तर, पॅड आणि टॅम्पोन्स दर तीन ते चार तासांनी बदलावे लागतात. पॅड आणि टॅम्पोन्सममध्ये जास्त रक्तस्राव जमा करण्याची क्षमता असते. मेन्स्ट्रुअल कपमध्ये 15-25 मिली रक्त जमा करता येणे शक्य आहे. साधारण टॅम्पोन्स किंवा पॅडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. परिणामी, तुम्ही 8 तासांपर्यंत एक कप वापरू शकता.
कमी चिडचिड आणि योनि कोरडेपणापासून सुटका: काही महिलांना पॅड वापरताना चिडचिड होते किंवा टॅम्पन्स वापरताना योनीतून कोरडेपणा येतो. पण मेन्स्ट्रुअल कप वापरताना तुम्हाला याचा सामना करावा लागणार नाही.
menstrual cups
कमी गोंधळ आणि सुरक्षित: बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीचा कप वापरणे अतिशय स्वच्छ वाटतात. तसेच पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक रसायनं आणि कृत्रिम पदार्थ असतात. त्यामुळे स्त्रियांच्या योनीजवळ जळजळ होणे, पुरळ येण्याची समस्या होते. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने ही समस्या होणार नाही. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात.
मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे काही तोटे आहेत का?:
मासिक पाळीचा कप वापरण्यासाठी थोडा वेळ लागतो. चुकीच्या पद्धतीने घातल्यास अस्वस्थ वाटू शकते. तसेच मासिक पाळीचा कप रिकामा करणे आवश्यक असते . तो कप पुन्हा घालण्यापूर्वी साबण आणि पाण्याने धुवावा लागतो, त्यामुळे जर तु्म्हाल कुठे 10 ते 12 तासांसाठी बाहेर जायचं असेल आणि तिथे काही स्वच्छ करण्यासाठी पर्याय नसेल तर त्यावेळी कप वापरणे शक्यतो टाळावाच लागतो. फक्त हे दोन मुद्दे सोडले तर मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे तसे फायदेच पाहायाला मिळतात.
menstrual cups
कप वारण्याआधी डॉक्टरांशी बोला: सध्या बाजारात विविध प्रकारचे आणि आकाराचे मेन्स्ट्रुअल कप उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला पॅड आणि टॅम्पोन्सपेक्षा पहिल्यांदा कप विकत घेणे थोडे महागडे वाटू शकतं. पण ही एक महत्त्वाची आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट नक्कीच ठरू शकते.
कप विकत घेण्याआधी तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेऊन तुमच्यासाठी कोणता कप योग्य आहे, याबाबत चर्चा नक्की करा आणि त्यानंतर योग्य तो कप खरेदी करा. तसेच वापरण्याबाबत जर कोणती अडचण येत असेल तर तेही तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून समजून घेऊ शकता.