सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणे

| Updated on: Dec 11, 2020 | 5:01 PM

पोटासंबंधित विकारही कोरोनाचे लक्षणं असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे (Bad digestive system also symptoms of Corona)

सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित हे विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणे
Follow us on

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात तर कोरोनाबाधितांचा आकडा थेट 97 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनाचे दररोज वेगवेगळे लक्षणे समोर येत आहेत. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, घशात खवखव हे कोरोनाचे सर्वसामान्य लक्षणं आहेत. मात्र आता पोटासंबंधित विकारही कोरोनाचे लक्षणं असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

भारतात अशा काही केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये कोरोनाबाधितांना पोटाशी संबंधित आजार असल्याचं समोर आलं. अमेरिकन जनरल ऑफ एमर्जन्सी मेडिसिनने याबाबत दावा केला आहे (Bad digestive system also symptoms of Corona).

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी न्यूयॉर्क शहरातील कोरोना रुग्णालयांमधील 12 हजार रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये जवळपास 51 टक्के रुग्ण हे पोटाच्या विकारा संबंधित तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांना गॅस, डायरिया सारख्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती अभ्यासात समोर आली.

भारतातही अनेक रुग्ण

भारतातही अशाचप्रकारचे रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हा रुग्णालयात जवळपास 20 टक्के कोरोनाबाधित सुरुवातीला पोटाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अशा रुग्णांना लिव्हरशी संबंधित त्रासही असल्याचं समोर आलं आहे (Bad digestive system also symptoms of Corona).

कोरोनाचे दिवसेंदिवस वेगवेगळे लक्षणे समोर येत आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांपुढे हे एक मोठं आव्हान आहे. दरम्यान, सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशनने ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या नव्या लक्षणांबाबत माहिती जारी केली होती. यामध्ये सर्दी, थंडी वाजणे, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा दुखणे, गंध आणि चव जाणे यांचा समावेश होता. नॅशनल हेल्थ सर्विसने सप्टेंबर महिन्यात डोळ्यांसंबंधित आजार आणि त्वचेचा रंग बदलणे यांनादेखील कोरोनाचे लक्षणे असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा : Fact Check | कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ लावण्याची अफवा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…