
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वातावरणातील प्रदूषणामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. निरोगी राहाण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश करावा. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबरचा समावेश करणे गरजेचे आहे. निरोगी आणि पोषक तत्वांचा समावेश तुमच्या आहारात केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाही.
अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात. अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्सचा समावेश केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. तुमच्या आहारामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचा समावेश केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया अँटिऑक्सिडेंट्सचे फायदे.
अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील रोगप्रतिरारकशक्ती वाढ्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, बीटा-कॅरोटीन आणि सेलेनियम यांच्या सारखे पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला रोगांशी लढण्यास मदत करते. बदलत्या वातावरणामध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांच्या सारखे संसर्गाचे आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे मुक्त रॅडिकल्सचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग आणि बारीक रेषा यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी आणि ई सारख्या अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि मऊ करण्यास मदत करतात . अँटी-ऑक्सिडंटमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. अँटी-ऑक्सिडंटमुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल शरीरातून निघून जाते, ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या सरळीत होण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहाण्यास मदत होते आणि हृदय विराक होत नाही. बेरी, नट आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर असतात.
अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. अँटी-ऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्स काढून टाकते ज्यामुळे डीएनएचे नुकसान होते आणि चेहऱ्यामधील पेशींची दुरुस्ती होते. ग्रीन टी, ब्रोकोली, गाजर आणि टोमॅटो यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. अँटी-ऑक्सिडंट्स दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट मोतीबिंदू आणि वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करतात. पालक, गाजर या भाज्यांचे सेवन डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्यांची कार्य क्षमता वाढवतात. ब्लूबेरी, अक्रोड आणि हळद यासारखे खाद्यपदार्थ मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत.