
मुंबई : भारतात आणि जगात इतरत्रही स्वयंपाकघरात टोमॅटोचा (Tomato) वापर सढळरित्या केला जातो. टोमॅटोची भाजी, सार, सूप, चटणी असतेच, त्याशिवाय पावभाजी , भेळ, उतप्पा, टोमॅटो ऑम्लेट, पिझ्झा, बर्गर या पदार्थांमध्येही टोमॅटोला महत्व आहे. टोमॅटोमुळे पदार्थाची केवळ चवच वाढत नाही तर तो आपल्या शरीरासाठीही तितकाच फायदेशीर असतो. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ए (Vitamin A), फायबर (Fiber), फोलेट आणि कॅल्शिअमसारखी (Calcium) पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. सॅलॅडमधूनही आपण टोमॅटोचे सेवन करू शकतो. त्याशिवाय टोमॅटोचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हा ज्यूस प्यायल्याने आपल्या तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया टोमॅटोच्या सेवनाचे फायदे…
वर नमूद केल्याप्रमाणे टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने दृष्टी चांगली होते. डोळे निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस नियमितपणे प्यावा.
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅरोटिन, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फ्लेवोनाइड सारखी अनेक पोषक तत्वं असतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच त्यामध्ये लायकोपीन व बीटा-कॅरोटीन सारखी पोषक तत्वेही असतात. हे सर्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे टोमॅटोच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्ही कमी आजारी पडता.
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये फायबर असते. हा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. त्याचे नियमितपणे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे त्रासला असाल तर रोज एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस नक्की प्या.
टोमॅटोचा ज्यूस हा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम करतो. त्याचे रोज सेवन केल्यास किडनी आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोमध्ये लायकोपीन, बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन – सी सारखी पोषक तत्वे असतात. जी हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करतात.
टीप : या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.