Hair Fall : ‘या’ महिन्यात गळतात सर्वात जास्त केस, तज्ज्ञांचा हा सल्ला जरूर ऐका

आजकाल केसगळती आणि केस तुटण्याच्या समस्येमुळे बरेच जण हैराण होतात. बदलत्या ऋतूमानानुसार, केसगळती व केस तुटणे यातही वाढ होताना दिसते. केस जास्त गळतात, उपाय आहेत तेही पाहू

Hair Fall : 'या' महिन्यात गळतात सर्वात जास्त केस, तज्ज्ञांचा हा सल्ला जरूर ऐका
केस गळतीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:18 AM

मुंबई : Hair Loss : पावसाळ्याच्या (Monsoon Season) दिवसातील आर्द्रतेचा आपल्या तब्येतीवर विशेषत: केसांवर खूप परिणाम होत असतो. ओलाव्यामुळे केस सतत भिजलेले आणि एकमेकांना चिकटलेले राहतात. आणि त्याचमुळे बऱ्याच लोकांना केस गळण्याचा (Hair fall problem)अथवा केसांसंदर्भात इतर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच बदलत्या ऋतूत हेअर एक्पर्ट्स केसांची विशेष काळजी (Hair care) घेण्याचा सल्ला देतात. केसगळती किंवा केस तुटण्याची समस्या कशी थांबवावी, त्यावर उपाय काय, यासंदर्भात अनेक जण ऑनलाइन बरीच माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ते उपाय अवलंबतात. मात्र हे उपाय करण्यापूर्वी, ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली, केसगळतीचे कारण काय (Reason behind hair loss), हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे ठरते. ते एकदा कळले की त्यावर उपाय करणे सोपे असते. काही जणांचे केस नेहमी गळत असतात, तर काहींचे केस एका विशिष्ट ऋतूमध्ये अथवा विशिष्ट काळातच गळतात. मात्र वर्षभरात सर्वात जास्त केस कोणत्या ऋतूत गळतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? नुकत्याच एका हेअर एक्स्पर्टने सांगितले की एका विशिष्ट महिन्यात केस गळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

‘या’ महिन्यात गळतात सर्वात जास्त केस :

सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त केस गळतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिल्याचे Express.co.uk ने नमूद केले आहे. शरद ऋतूच्या तापमानातील घट आणि तणाव हे यामागचे ( केसगळती) कारण मानले जाते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केस गळण्याचे प्रमाण सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त असते आणि जानेवारीपर्यंत हे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. तुम्ही जर योग्य आहार व जीवनशैली अवलंबवली तर गळून गेलेल्या केसांच्या जागी नवे केस येऊ शकतात.

यूकेमधील प्रसिद्ध हेअर सलूनचे मालक, मार्क ब्लॅक यांनी या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्याने त्यांना या विषयात बरीच माहिती आहे. ब्लॅक यांच्या सांगण्यानुसारर, केसांसाठी सप्टेंबर हा अतिशय खराब महिना मानला जातो. कारण या काळात तापमानात बराच बदल झालेला पहायला मिळतो. मात्र त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून केसगळती हळूहळू कमी होते आणि जानेवारी पर्यंत ते बंद होते. ” तणाव हा फक्त आपल्या शरीरासाठी नव्हे तर केसांसाठीही खूप हानिकारक असतो. तणावामुळे शरीरातील एड्रेनॅलाइन व कोर्टिसॉल हार्मोन्सचे उत्पादन वाढते, ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढीची प्रक्रिया बिघडते आणि मोठ्या प्रमाणात केसगळती सुरू होते, ” असेही मार्क ब्लॅक यांनी नमूद केले.

हेअरकेअर ब्रँड Nioxin द्वारे 2000 व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये असे आढळून आले की, 10 पैकी 6 व्यक्तींचे केस गळलेले होते. केसगळती रोखणे शक्य आहे, मात्र त्यासाठी योग्य आहार आणि चांगली जीवनशैली अवलंबणे गरजेचे आहे, असे ब्लॅक यांनी सांगितले. वनपोलने केलेल्या संशोधनानुसार, ताण-तणावामुळे केसगळती वाढते. एखादया 34 वर्षांच्या व्यक्तीचे केस पातळ होऊ लागतात. केस पातळ झाल्यानंतर 41 टक्के लोक ते लपवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून इतर लोक त्यांची टर उडवू नयेत. केस लपवण्यासाठी टोपी, स्कार्फ वा इतर उपायांचचा अवलंब केला जातो.

‘हे’ पदार्थ खाल्यामुळेही गळू शकतात केस :

नेचर जर्नलमध्ये छापून आलेल्या एका आर्टिकलनुसार, केस गळतीच्या समस्येमध्ये अनुवांशिकता, मानसिक स्थिती आणि जीवनशैली कशी आहे आहे, या तिन्ही गोष्टी मुख्य भूमिका निभावतात. हार्ड फॅट डाएट आणि जाडेपणा असलेल्या लोकांमध्ये रोम स्टेम सेल (HFSCs) कमी असतात, ज्यामुळे केसांची वाढ खुंटते. यामुळे नवे केस उगवत नाहीत अथवा त्यांची घनता कमी होते. HFSCs प्रक्रिया म्हणजे, ज्यामध्ये आपल्या केसांची सतत वाढ होत राहते.

केसांचे चांगले आरोग्य व वाढीसाठी चांगली जीवनशैली गरजेची आहे. त्याशिवाय आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए , प्रोटीन आणि लोहयुक्त (आयर्न) पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.