AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : चेहरा आणि केस (Hair)  निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आणि चांगली जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. निरोगी केस आणि त्वचेसाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता. तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता. ते केस आणि त्वचेचे सखोल पोषण करण्याचे काम करतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स (Dry fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळेच लहान मुलांच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा जास्तीत-जास्त समावेश करावा, असे डाॅक्टर नेहमीच सांगतात. फक्त ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी (Health) नव्हेतर ते आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स मदत करतात.

मनुका

मनुका अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी सुकामेवा आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. मनुका केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे त्वचा तरुण राहते. हे कोरडे केस आणि केस गळण्याची समस्या टाळते. विशेष म्हणजे मनुका वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करतो. मनुक्याच्या पाण्याचे दररोज सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते.

जर्दाळू

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते. यामुळे दररोजच्या आहारात नक्कीच जर्दाळूचा समावेश करा. जर आपण जर्दाळूचा फेसपॅक करून चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अंजीर

आपल्यापैकी अनेकांना अंजीर खाण्यास अजिबात आवडत नाहीत. मात्र, अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अंजीरमध्ये लोह, जीवनसत्त्वे, आहारातील फायबर आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि मुरुम दूर होतात. हे केस मजबूत आणि चमकदार बनवते. जर आपल्याला अंजीर खायला आवडत नसतील तर आपण अंजीरचा ज्यूस करून देखील आहारात समाविष्ट करू शकता.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार