Health : केवळ गरम पाणी नव्हे , अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ मिसळा, अनेक आजार दूर होतील…

| Updated on: Aug 23, 2022 | 1:35 PM

गरम पाण्याने स्नान करण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत असतील , पण गरम पाण्यात मीठ घालून स्नान करण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहीत असतील. निरोगी राहण्यासाठी रोज साध्या पाण्याने स्नान करणे पुरेसे नाही. गरम पाण्यात मीठ मिसळून त्याने स्नान केल्यास अनेक आजारांपासून रक्षण होऊ शकते.

Health : केवळ गरम पाणी नव्हे , अंघोळीच्या पाण्यात हा पदार्थ मिसळा, अनेक आजार दूर होतील...
Follow us on

मुंबई : भारतात लोक रोज स्नान करतात, पण त्यासाठी किती जण निरोगी पद्धतीचा वापर करतात, हे जाणून घेणे कठीण आहे. गरम पाण्याने स्नान (Hot Water Bath) करण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत असतील , पण गरम पाण्यात मीठ घालून (Add Salt in Bath Water) स्नान करण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहीत असतील. बाहेरच्या देशांमध्य बाथटब मध्ये स्नान केले जाते. आणि तिथे मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे, ही खूप कॉमन गोष्ट आहे. निरोगी (Healthy) राहण्यासाठी रोज साध्या पाण्याने स्नान करणे पुरेसे नाही. गरम पाण्यात मीठ मिसळून त्याने स्नान केल्यास अनेक आजारांपासून (prevents diseases) रक्षण होऊ शकते. आयुर्वेदिक डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी सांगितले की, मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मीठातील सूक्ष्म आणि तीक्ष्ण गुणधर्मांमुळे ते शरीरातील छिद्रांमध्ये सहज प्रवेश करून नीट स्वच्छता करू शकते. तसेच त्यातील औषधीय गुणधर्मांमुळे शरीराचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

अंघोळीसाठी कोणते मीठ फायदेशीर ?

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासंदर्भातील आजारांचा उपचार करण्यासाठी ‘ बाथ सॉल्ट ‘चा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वर्षांपासून एक सोपा आणि स्वस्त उपाय म्हणून त्याचा वापर केला जातो. साधारणत: बाथ सॉल्ट हे मॅग्नेशिअम सल्फेट म्हणजेच समुद्री मीठापासून बनलेले असते. जे गरम पाण्यात सहजरित्या विरघळते. एक बादली पाण्यात 1 चमचा मीठ मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.

डॉक्टरांनी सांगितले मीठाच्या पाण्याने स्नान करण्याचे फायदे

डॉ. शरद कुलकर्णी यांच्या सांगण्यानुसार, गरम पाण्यात मीठ घालून त्याचा वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. तसेच स्नायूंना आराम मिळतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.

हे सुद्धा वाचा

सॉल्ट बाथमुळे मिळतो सांधेदुखीपासून आराम

सॉल्ट बाथमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि सूज कमी होऊन दुखणेही कमी होते. त्यामुळे सांधेदुखी, गुडघ्यांचे दुखणे आणि पाठदुखीही कमी होऊन आराम मिळतो. याशिवाय सॉल्ट बाथमुळे सूज कमी होऊन जुनाट दुखण्यांपासूनही आराम मिळतो.

रोगप्रतिकारक्षमता वाढते

मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. मीठाच्या पाण्यात ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी करून ताकद मिळते. मीठाच्या पाण्यात असलेल्या ॲंटी -बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे धोकादायक सूक्ष्मजंतू दूर करण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते.

मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तणाव होतो दूर –

गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने थकवा आणि ताण दूर होतो. जर तुम्हाला खूप ताण सहन करावा लागत असेल तर मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे दिवसभराचा थकवा कमी होतो आणि रात्री चांगली व गाढ झोप लागते.

त्वचेवरील सूज आणि जळजळ होते कमी

एक्झिमा, सोरायसिस, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस आणि ॲथलीट फूटमुळे त्वचेवर येणारी सूज आणि होणारी जळजळ, मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे दूर होऊ शकते. आंघोळीच्या पाण्यात १ चमचा टेबल सॉल्ट मिसळावे. त्याचा फायदा होऊ शकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )