Black Pepper Essential Oil : आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

| Updated on: Jan 30, 2022 | 4:29 PM

जर तुम्ही पचनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर काळी मिरीचं तेल तुमच्यासाठी उत्तम काम करते. कारण ते तुमच्या पचनसंस्थेला उत्तेजित करण्यास मदत करू शकते, तोंडातील लाळ ग्रंथीपासून ते मोठ्या आतड्यापर्यंत हे तेल फायदेशीर ठरेल.

Black Pepper Essential Oil : आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे
आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळीमिरीचे तेल
Follow us on

मुंबई : काळी मिरी (Black Paper) हा मसाल्यांमधील एक महत्वाचा घटक आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक वापरले जाते. काळीमिरीमध्ये मॅंगनीज, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन के आणि कॅरोटीन यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे सुपरफूड(Super Food) म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेक आरोग्यविषयक आजार दूर होण्यास मदत होते. काळी मिरी विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. काळ्या मिरीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. हे औषध म्हणून वापरले जाते. अरोमाथेरपीसाठी काळी मिरी एझेन्शिअल तेल वापरले जाते. हे एझेन्शिअल तेल वेदना आणि पेटके कमी करते, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करते, शरीर डिटॉक्सिफाय करते आणि चिंता कमी करते. (Black pepper oil is very beneficial for health, know its health benefits)

पेटक्यांपासून आराम देते काळीमिरी तेल

काळीमिरीमध्ये वार्मिंग, अँटिस्पास्मोडिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जर आपल्याला पेटके येणे, मांसपेशीमध्ये आकुंचन होणे असे त्रास असतील तर काळी मिरी एझेन्शिअल तेलाने मालिश केल्यास पेटके कमी करण्यास मदत होते आणि टेंडोनायटिस सुधारते. याशिवाय काळी मिरी एझेन्शिअल तेल संधीवाताच्या लक्षणांपासून देखील आराम देते.

चिंता आणि तणाव कमी करते

काळी मिरी एझेन्शिअल तेल प्रामुख्याने अरोमाथेरपीसाठी वापरले जाते. या तेलाच्या वापरामुळे आपला तणाव आणि चिंता कमी करण्यास फायदेशीर ठरते. त्याचा सुगंध तुमच्या नसा शांत करून आणि तुमच्या स्नायूंना आराम देऊन तुम्हाला शांत करण्यात मदत करू शकतो. याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही डिफ्युझर वापरू शकता. यामुळे तुमचा मूड सुधारेल.

पचन क्रिया सुधारणे

जर तुम्ही पचनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर काळी मिरीचं तेल तुमच्यासाठी उत्तम काम करते. कारण ते तुमच्या पचनसंस्थेला उत्तेजित करण्यास मदत करू शकते, तोंडातील लाळ ग्रंथीपासून ते मोठ्या आतड्यापर्यंत हे तेल फायदेशीर ठरेल. याचा अर्थ असा की हे अरोमाथेरपी तेल अपचन, मळमळ, अतिसार, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या सुधारू शकते.

धूम्रपानाची लालसा कमी करते

काळी मिरी एझेन्शिअल तेलामध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे ज्यांना धूम्रपान सोडायचे त्यांच्यासाठी हे तेल त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सोडू शकत नाहीत, त्यांना या तेलामुळे धूम्रपानाशी संबंधित लालसा कमी करण्यास देखील मदत होते. (Black pepper oil is very beneficial for health, know its health benefits)

इतर बातम्या

Winter Superfoods : हिवाळ्यात ‘या’ सुपरफूड्सचा आहारात नक्की समावेश करा आणि निरोगी राहा!

Beauty tips : या गोष्टी थेट चेहऱ्यावर लावणे टाळा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!