Health Care Tips : चहासोबत या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक…

बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत चहा आणि पकोडे खाण्याची सवय जवळपास सर्वांनाच असते. पकोडे हे बेसन पासून तयार केली जातात आणि त्यामध्ये तेलही अधिक प्रमाण असते. बेसनापासून बनवलेले पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.

Health Care Tips : चहासोबत या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक...
चहासोबत या गोष्टींचे सेवन टाळा.
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 8:57 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांची सुरूवात सकाळी एक कप चहा (Tea) घेतल्याशिवाय होत नाही. चहा प्यायला जवळपास सर्वांनाच आवडतो. मात्र, अनेकांना चहासोबत चमकदार किंवा काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. बरेच लोक जेवण केल्यानंतरही चहाचे सेवन करतात. परंतु त्यात असलेले कॅफिन (Caffeine) अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यामुळेच चहा पिताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी. चहाचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर समस्यांना निर्माण होऊ शकतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी (Acidity) होऊ शकते, त्याचप्रमाणे काही पदार्थ खाल्ल्यानंतर चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. चला तर याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

थंड पदार्थांनंतर चहाचे सेवन नको

बरेच जण थंड पदार्थांचे सेवन अगोदर करतात आणि त्यानंतर चहाचे सेवन करतात. थंड पदार्थांवर चहा प्यायल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. पोटात गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर या पद्धतीचा दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हिरड्याही कमकुवत होऊ शकतात. काही थंड खाल्ल्यानंतर चहा प्यायचा असेल तर अर्ध्या तासाचे अंतर नक्की ठेवा.

पकोडे आणि चहा

बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत चहा आणि पकोडे खाण्याची सवय जवळपास सर्वांनाच असते. पकोडे हे बेसन पासून तयार केली जातात आणि त्यामध्ये तेलही अधिक प्रमाण असते. बेसनापासून बनवलेले पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. बेसनापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी चहा प्या.

लिंबू पाणी आणि चहा

सध्या वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करतात. त्यानंतर लगेचच सवयीप्रमाणे चहाचे सेवन करतात. तज्ञांच्या मते, यामुळे ऍसिडिटी होऊ शकते किंवा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. लिंबूमध्ये असलेले ऍसिड आणि चहाचे मिश्रण पोटाला हानी पोहोचवू शकते आणि तुम्हाला आजारी बनवू शकते.

(वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 
Side Effects Of Ghee | आरोग्याच्या या समस्या आहेत?, तर तुपापासून चार हात दूरच राहा!

Skin | मसूर डाळीमध्ये हे घटक मिक्स करून फेसपॅक तयार करा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!