Corona : अशी ओळखा डेल्टा, ओमिक्रॉनची लक्षणे; लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

| Updated on: Jan 09, 2022 | 5:38 PM

सध्या डेल्टापेक्षा ओमिक्रॉनबाधितांचे प्रमाणत कमी आहे. या दोनही व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये साम्य असले तरी देखील काही लक्षणे ही वेगळी आहेत. आपण आज या लक्षणांबाबत जाणून घेणार आहोत.

Corona : अशी ओळखा डेल्टा, ओमिक्रॉनची लक्षणे; लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा
Follow us on

नवी दिल्ली : पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात दररोज लाखो कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.  कोरोनाचा विषाणू  डेल्टाचे संक्रमण अधिक झपाट्याने होत आहे. मात्र त्यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचे रुग्ण देखील आता आढळून येऊ लागले आहेत. सध्या डेल्टापेक्षा ओमिक्रॉनबाधितांचे प्रमाणत कमी आहे. या दोनही व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये साम्य असले तरी देखील काही लक्षणे ही वेगळी आहेत. आपण आज या लक्षणांबाबत जाणून घेणार आहोत.

तीव्र ताप

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या या दोनही व्हेरिएंटची अनेक लक्षणे ही सारखीच आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या डाटानुसार अशी चार लक्षणे आढळून आली आहेत, की जे कोरोनाच्या या दोन व्हेरिएंटमधील अंतर स्पष्ट करतात. याबाबत बोलताना कोविड तज्ज्ञ डॉ. अजय कुमार यांनी म्हटले आहे की, डेल्टा आणि ओमिक्रॉन याची बहुतेक लक्षणे ही सारखीच आहेत. मात्र रुग्णांवरील उपचारादरम्यान आम्हाला अशी काही लक्षणे आढळून आली आहेत, जी या दोन व्हेरीएंटमधील अंतर स्पष्ट करू शकतात. डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना तीव्र असा ताप असतो. जो अनेक दिवस राहातो. मात्र ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये असे कोणतेही लक्षण आढळून येत नाही. डेल्टाची लागण झाल्यास संबंधित व्यक्तीला दहा ते बारा दिवस ताप राहातो. मात्र ओमिक्रॉनमध्ये संबंधित व्यक्तीला केवळ चार ते पाचच दिवस ताप असतो. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये तीव्र डोके दुखी आढळून येते. मात्र डेल्टामध्ये शक्यतो ही लक्षणंआढळून येत नाहीत.

फेफड्यांचे नुकसान 

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे फेफड्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. डेल्डा व्हेरिएंटची लागण झाल्यास शरीरातील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होते. रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास फेफड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. मात्र ओमिक्रॉनमध्ये अशा प्रकारचे लक्षणे आढळून येत नाहीत. वरील पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

डोके दुखीचा त्रास होतोय?, ‘हे’ घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज

लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?

लस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून काय करावं? लसीकरण केंद्रावर काय काळजी घ्यावी?