डोके दुखीचा त्रास होतोय?, ‘हे’ घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज

डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र असे काही घरगुती उपाय आहोत, ज्यामुळे तुमची डोके दुखीपासून सुटका होऊ शकते.

डोके दुखीचा त्रास होतोय?, 'हे' घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज

डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. अति तणावातून सुध्दा डोके दुखू  शकते. तर कधी तुम्ही आजारी असल्यामुळे सुद्धा डोके दुखू शकते. डोके दुखीचा त्रास होत असेल तर तो थांबण्यासाठी काय करावे. त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना अॅसिडिटीमुळे देखील डोकेदुखीचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा :  डोकेदुखीचे एक महत्त्वाचे आणि कॉमन कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कमी झालेले पाणी हे असते. तुमचे जर डोके दुखत असेल तर भरपूरप्रमाणात पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवा. शरीरात पाणी योग्य प्रमाणात असेल तर  शक्यतो डोकेदुखीचा त्रास होत नाही. पाण्यासोबतच विविध फळांचे ज्यूस तसेच नारळ पाणी देखील प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

पुरेशा प्रमाणात झोप घ्या : बऱ्याचवेळा अपुरी झोप हे देखील डोके दुखीचे कारण असू शकते. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला डोके दुखीचा त्रास जाणू शकतो. त्यामुळे दररोज कमीत कमी सात ते आठ घंटे झोप घ्या. पुरेशा प्रमाणात झोप झाल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहातात आणि डोकेदुखीचा त्रास देखील होत नाही.

डोक्याची मॉलिश करा: जर तुम्हाला वारंवार डोके दुखीचा त्रास होत असेल तर डोक्याची मॉलिश करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कोकोनट ऑइलचा उपयोग तुम्ही मॉलिश करताना करू शकता. तुमचे जिथे डोके दुखत आहे, त्या भागावर अंगठा आणि कंरगळीच्या साह्याने हळूहळू प्रेस करावे. कमीत कमी दहा ते पंधार मिनेट मॉलिश केल्यास तुम्हाला काही प्रमाणात आराम जाणू शकतो.

गरम पाण्याने अंघोळ करा: हा देखील डोके दुखी थांबवण्याचा एक चांगला रामबाण इलाज आहे. तुमचे डोके दुखत असल्याने तुम्ही गरम पाण्याने डोके धुवा. असे केल्यास तुम्हाला आराम वाटू शकतो. मात्र खूपच तीव्र डोके दुखी होत असल्यास घरगुती उपाय न करता, डॉक्टरांचाच सल्ला घेणे गरजेचे असते.

संबंधित बातम्या 

लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?

लस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून काय करावं? लसीकरण केंद्रावर काय काळजी घ्यावी?

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु, 10 ते 12 वयोगटातील मुलांना का लस नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI