AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही क्षणी अमेरिकेतून भारताबद्दल होऊ शकतो धक्कादायक निर्णय, हादरवणारी माहिती पुढे, थेट…

भारत आणि अमेरिकेतील संबंध काही दिवसांपासून तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. आता तो कमी करून 18 टक्के करण्यात आला. मात्र, यादरम्यानच भारतासाठी वाईट बातमी अमेरिकेतून येत आहे.

कोणत्याही क्षणी अमेरिकेतून भारताबद्दल होऊ शकतो धक्कादायक निर्णय, हादरवणारी माहिती पुढे, थेट...
Donald Trump
| Updated on: Feb 19, 2026 | 9:27 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील याचा भरोसाच नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे एक स्पष्ट धोरण जगाने बघितले आहे. जो कोणी आपले म्हणणे ऐकणार नाही, त्याच्यावर भरमसाठ टॅरिफ लावायचा. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक देशांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यापैकी एक भारतही आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण पुढे करत डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारताने कोणत्याही परिस्थितीत रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता विविध प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचे काम करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या सहकार्यांकडून भारताबद्दल विविध धक्कादायक विधाने करण्यात आली. एकीकडे टीका तर दुसरीकडे भारताचे काैतुकही अमेरिकेतून करण्यात आले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. मग अचानक भारतावरील टॅरिफ कमी करून 18 टक्के करण्यात आला.

भारत आणि अमेरिकेत व्यापार करार झाले असून त्याची घोषणा फक्त शिल्लक आहे. तांत्रित बाबींवर काम सुरू आहे. भारतावरील टॅरिफ अमेरिकेने कमी केला, ही वस्तूस्थिती असली तरीही अत्यंत मोठी धोक्याची घंटा अमेरिकेतून भारतासाठी आली. अमेरिकेतून असा दावा करण्यात आला आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर सध्या मोठा टॅरिफ लावण्याचे कारणच फक्त शोधत आहेत.

अमेरिकेचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फक्त आणि फक्त भारतावर वेगळ्या पद्धतीने मोठा टॅरिफ लावण्याचे कारण शोधत आहेत. भारत हा रशियाकडून 21 टक्के कच्चे तेल खरेदी करतो. पण भारताला निशाणा बनवले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरात लवकर त्यांची निती बदलणे आवश्यक आहे.

ब्रॅड शर्मन यांच्या या दाव्याने नक्कीच भारताचे टेन्शन वाढले आहे. कारण भारतावरील टॅरिफ आता कुठे कमी करण्यात आला. मात्र, जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात भारताविरोधात अशी काही खिचडी शिजत असेल तर ही भारतासाठी मोठी धोक्याची घंटा निश्चितपणे म्हणावी लागेल. व्यापार कराराची घोषणा झाली आणि अमेरिकेने पुन्हा भारतावर टॅरिफ लावला तर समस्या अधिक वाढू शकतात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार