AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा विश्वासघात; जवळच्याच व्यक्तीने उचलला फायदा

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला. करिअरच्या सुरुवातीला एका जवळच्याच व्यक्तीने तिचा विश्वासघात केला होता. ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घ्या..

प्रसिद्ध अभिनेत्रीचा विश्वासघात; जवळच्याच व्यक्तीने उचलला फायदा
Richa ChadhaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2026 | 9:15 AM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी जरी आलिशान आणि झगमगत्या विश्वास राहत असले तरी अनेकदा काहींसोबत असं काही घडतं, ज्यावर चाहत्यांचाही विश्वास बसत नाही. अभिनेता असो किंवा अभिनेत्री.. करिअरच्या सुरुवातीला अनेकांना या इंडस्ट्रीत कटू अनुभवांचा सामना करावा लागतो. प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढानेही अशा घटनेच्या वेदना सहन केल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीला एका जवळच्या व्यक्तीनेच तिची फसवणूक केली होती. जेव्हा एखादी व्यक्ती वयात येते किंवा काही गोष्टींबद्दल त्यांच्यात भोळेपणा असतो, तेव्हा अनेकदा त्या व्यक्तीला अशा परिस्थितींना तोंड द्यावं लागतं ज्या समजणं अत्यंत कठीण असतात. रिचासोबतही असंच काहीसं घडलं. तिच्या जवळच्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला होता. यातून आयुष्याने खूप मोठा धडा शिकवल्याचं ती म्हणते.

रिचा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. परंतु सुरुवातीपासूनच ती अशा स्वभावाची नव्हती. आयुष्यातील काही अनुभवांमुळे ती बिनधास्त वागायला आणि बोलायला शिकली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संबंधित व्यक्तीचं नाव न घेता रिचाने तिचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी हा सर्वांत कठीण धडा शिकले की प्रत्येकाला तुमची काळजी नसते. मी त्यावेळी खूप भोळी होते. तुम्ही करिअरमध्ये थोडं पुढे जावं किंवा तुम्हाला इतरांपेक्षा थोडं अधिक महत्त्व मिळावं, अशी त्यांची अजिबात इच्छा नसते. त्यांचा स्पॉटलाइट दुसरे हिरावून घेण्याची भीती त्यांच्यात असते. याच भीतीतून ते विश्वासघात करतात.”

रिचा चड्ढाने नुकतीच मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. अनिल कपूर, मनोज वाजपेयी, शबाना आझमी आणि झोया अख्तर यांसारखे इतरही काही बॉलिवूड कलाकार तिथे उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीला भेटल्यानंतर रिचाने आनंद व्यक्त केला. रिचाने या भेटीचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ‘फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना भेटून खूप आनंद झाला. स्वतंत्र सिनेमाच्या उज्ज्वल भविष्याला चालना देण्यास रस घेतल्याबद्दल धन्यवाद’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.