AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेब निघून गेले तर…; मंत्रालयातील लाचखोरीचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर, पाहा काय घडलं?

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे खळबळजनक स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे यांचा लाचेसाठी तडजोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

साहेब निघून गेले तर...; मंत्रालयातील लाचखोरीचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर, पाहा काय घडलं?
Bribe Sting Operation
| Updated on: Feb 19, 2026 | 9:21 AM
Share

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावरुन सध्या विविध चर्चांना उधाण आलेले असताना आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे एक स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विभागातील क्लार्क आणि पीए थेट लाचेची मागणी करताना या व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. मंत्र्यांकडे असलेल्या एका अपील अर्जावर सकारात्मक निकाल देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. एसीबीने केलेल्या कारवाईत ढेरिंगेच्या कार्यालयातून ४२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर त्याच्या नाशिकमधील घरावरही छापे टाकून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. आता याच संदर्भातील एका स्टिंग ऑपेरशनचा व्हिडीओ समोर आला आहे.

हे स्टिंग ऑपरेशन तक्रारदाराने केले आहे. यामध्ये झिरवळांच्या विभागातील क्लार्क राजू ढेरिंगे आणि पीए रामदास गाडे हे ५० हजारांच्या लाचेसाठी तडजोडी करताना दिसत आहेत. टीव्ही ९ मराठीच्या हाती लागलेल्या या स्टिंगमध्ये भ्रष्टाचाराचा उघड नमुना पाहायला मिळत आहे. पण टीव्ही ९ मराठी या स्टिंग ऑपेरशनची पुष्टी करत नाही.

स्टिंगमधील धक्कादायक संभाषण काय?

  • रामदास गाडे (झिरवळांचे पीए): “बालाजी का…”
  • रामदास गाडे: “सरांची पण माझं बोलणं झालं.”
  • रामदास गाडे: “मॅडमचा पण फोन आला होता.”
  • रामदास गाडे: “पण चुका तुम्ही केल्यावर त्यामुळे ते आता करुन घे.”
  • रामदास गाडे: “तुझी कॅपिसिटी नाही. तुला हे पण पाहिजे. सगळ कसं फुकट होईल. प्लेनचं तिकीट तर काढावं लागेल ना.”
  • तक्रारदार: “आता नाही आहे.”
  • रामदास गाडे: “काय म्हणतो २५ म्हणतो, तलाठीपण घेत नाही.”
  • राजू ढेरिंगे (झिरवळांच्या विभागतील क्लार्क): “तुमच्याकडे कमीत कमी ५० असतील ना… ५० टक्के डिस्काऊंट देतो. ५० घेऊन ये तुमचं काम करुन देतो.”
  • तक्रारदार: “तेवढे नाही हो.”
  • राजू ढेरिंगे: “साहेब निघून गेले तर पुढच्या हप्त्यावर जाईल.”
  • राजू ढेरिंगे: “आता यापुढे काही बोलू नको.”
  • तक्रारदार: “थांबा फोन लावू द्या.”

या प्रकरणाची दखल घेण्याची शक्यता

हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर आता एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) या प्रकरणाची दखल घेण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयातील बड्या नेत्यांच्या दालनात बसून अशा प्रकारे लाचेची मागणी होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे झिरवळ यांच्या विभागातील कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणावर बोलताना नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले की, माझ्या नावाचा वापर करून जर कोणी चुकीचे काम करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी