AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Vivah 2026 : यंदा तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे? जाणून घ्या पूजा कशी करायची? आरती आणि साहित्य संपूर्ण विधी

तुळशीचं लग्न लावायचं हे तर माहित आहे. पण ते कसं लावायचं? त्यासाठी कोणती पूजा करायची? कसे विधी करायचे? साध्या सोप्या पद्धतीने छोट्या घरात तुळशीचे लग्न कसे लावायचे जाणून घ्या संपूर्ण

Tulsi Vivah 2026 : यंदा तुळशीच्या लग्नाचा  मुहूर्त कितीचा आहे? जाणून घ्या पूजा कशी  करायची? आरती आणि साहित्य संपूर्ण विधी
tulsi vivah Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 1:53 PM
Share

तुळशी विवाह म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. कुठे तुळशी वृंदावनाची सजावट, कुठे उसाचा मंडप, तर कुठे तुळशी, लग्नासाठी नवी साडी आणि दागिन्याची तयारी अगदी घरातील लग्न सोहळ्यात असल्यासारखं वातावरण तयार होतं पण यांना तुळशी विवाह नेमका कधी करायचा? 20 नोव्हेंबरला 21 नोव्हेंबरला असा प्रश्न अनेकांना पडलाय पंचांगानुसार 2026 मध्ये तुळशी विवाहाचा मुख्य दिवस 21 नोव्हेंबर शनिवार हा आहे मात्र काही कुटुंबांमध्ये देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी 20 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ही तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे.

तुळशी विवाह 2026 तारीख आणि शुभमुहूर्त

हिंदू पंचांगानुसार कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल तर 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:56 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदयतिथीनुसार 21 नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. मुंबईमध्ये तुळशी विवाह साठी संध्याकाळचा गोकुळी काळ साधारण 5 वाजून 59 मिनिटांपासून ते 6 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे. स्थानिक पंचांगानुसार मुहूर्तामध्ये थोडा फरक असू शकतो

तुळशी विवाह साठी लागणारे पूजेचे साहित्य :

तुळशी विवाहाची तयारी करताना तुळशीचे रोप शालीग्राम शिळा किंवा भगवान विष्णूंची मूर्ती, पूजेचा पाठ आणि पिवळे वस्त्र, चुनरी, हळद, कुंकू, चंदन, फुले हार, अक्षता, दिवा, धुप, कापूर, फळे आणि मिठाई असे साहित्य जवळ ठेवावे मंडप सजवण्यासाठी चार उसाच्या कांड्यांचीही आवश्यकता असते

घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा?

सर्वप्रथम तुळशी वृंदावनाची स्वच्छता करून त्या भोवती सुंदर रांगोळी काढावी. तुळशीच्या रोपाला लाल चुनरी किंवा साडी नेसून फुले बांगड्या इतर शृंगारच साहित्य अर्पण करावे. त्यानंतर उसाच्या चार कांड्यांच्या मदतीने तुळशीभोवती छोटासा मंडप तयार करावा. दुसऱ्या बाजूला पिवळे वस्त्र अंथरूण त्यावर शाळीग्राम शिळाची स्थापना करावी. भगवान विष्णूंचे स्मरण करून गणपतीची पूजा करावी. त्यानंतर तुळशी माता शाळीग्रामला हळदकुंकू, चंदन आणि फुले अर्पन करावी. दोघांना फुलांचे हार घालून तुळशीच्या ओढणीचा पदर आणि शाळेचा वस्त्र एकत्र बांधण्याची म्हणजेच गाठ बांधण्याची परंपरा आहे.

त्यानंतर मंगलाष्टके म्हणत विवाहाचे विधी करावेत काही ठिकाणी तुळशीभोवती शाही ग्राम ला घेऊन सात फेरे घालण्याची पद्धत आहे. शेवटी तुळशी माता आणि भगवान विष्णूंची आरती करून फळे मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटावा

तुळशी आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी। निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळशी ॥ धृ. ॥ ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी। अग्रीं शंकर तीर्थें शाखापरिवारीं। सेवा करिती भावें सकळहि नरनारी। दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ १ ॥ शीतल छाया भूतलव्यापक तूं कैसी। मंजिरीची बहु आवड कमलारमणासी। तव दलविरहित विष्णू राहे उपवासी। विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ २ ॥ अच्युत माधव केशव पीतांबरधारी। तुळसीदलें विष्णू पूजिती नरनारी। त्यांच्या कुळांलागीं कदा न बाधे मारी। संतोषोनि पद्मानाभ देई सुखकारी ॥

तुळशी विवाह धार्मिक महत्त्व काय धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह हा माता तुळशी आणि भगवान विष्णू यांच्या विवाहाचा उत्सव आहे आषाढी एकादशीपासून योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होतात अशी श्रद्धा आहे त्यानंतर जोशी विवाह केला जातो या विवाह नंतर अनेक घरांमध्ये लग्नसराई आणि शुभकार्यांना सुरुवात होते तुळशी विवाह केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते अशी धार्मिक मान्यता आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?