AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी उपाशी, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा; सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी येताच…

दुष्काळाच्या संकटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा समोर आला आहे. सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच आतषबाजी केली.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी उपाशी, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा; सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी येताच...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 2:01 PM
Share

राज्यातील 310 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आणखी काही तालुके यादीत समावेश होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळाच्या संकटामुळे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेतातील पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत. परंतु मिळणारी मदत तुटपुंजी आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.  बैल, गायी, म्हशींना चारा मिळणेही अवघड झालं आहे. या दुष्काळातही सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत.  नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करण्यात आला. तर उद्यानाच्या लोकार्पणात रेड कार्पेटच्या पायघड्या पाहायला मिळाल्या. कंधार येथील शांतिदूत गोविंदराव पाटील उद्यानाच्या उदघाटनप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचां आढावा घेतल्याच्या काही तासानंतरच सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यादरम्यान फटाके फुटले.  दुष्काळी परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. कंधार येथील उद्यानाच्या लोकार्पणापूर्वी सुनेत्रा पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केलीय़े. सुनेत्रा पवारांच्या स्वागतासाठी ढोल ताशे वाजवले.

नांदेडमध्ये दुष्काळावर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘मी दुष्काळी आढावा घेतलाय. सर्व अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. शासन दुष्काळात सर्वासोबत असतील.  पाणी चार नियोजन केले जात आहे.  याचा मी स्वतः आढावा घेणार आहे. शासन नियमाप्रमाणेच पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रखडलले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात भुजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवात झाली आहे.  200 फुटापेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यावर बंदी घातली आहे. चारा प्रश्नासाठी 3 कोटी मंजूर असून 14 हजार शेतकऱ्यांना चारा वाटप केला गेलाय. शेतकऱ्यांनी चारा पिके घ्यावीत’.

Follow Us
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?