कोरोनामुळे फक्त फुफ्फुसांनाच धोका नव्हे, तर रक्ताच्याही गुठळ्या होण्याची भीती

| Updated on: May 08, 2021 | 11:34 AM

तुमच्या शरीरातील अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी या रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे त्वरित काढणे आवश्यक असते. (Covid-19 not just lung disease also cause dangerous blood clots)

कोरोनामुळे फक्त फुफ्फुसांनाच धोका नव्हे, तर रक्ताच्याही गुठळ्या होण्याची भीती
corona mask
Follow us on

मुंबई : जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून दररोज नवनवे दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोरोना हा केवळ फुफ्फुसाचा आजार नाही तर यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, असा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या शरीरातील अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी या रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे त्वरित काढणे आवश्यक असते. (Covid-19 not just lung disease also cause dangerous blood clots)

रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीस डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. एका अभ्यासानुसार, सध्या कोरोना रुग्णांमध्ये डीव्हीटीची रुग्णांची टक्केवारी सुमारे 14 ते 28 टक्के आहे. तसेच, धमनी थ्रोम्बोसिसची टक्केवारी 2-5 टक्के आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना काळातील संसर्गामुळे फुफ्फुसांवरील रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होत आहे. दर आठवड्यात अशा प्रकारचे 5 ते 6 रुग्ण आमच्याकडे येतात. साधारणत: टाईप -२ मधुमेह असलेल्या रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?

रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीस डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. रुग्णाच्या शरीराच्या आतील भागातील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी निर्माण होते, तेव्हा डीव्हीटी फार गंभीर होते. त्यावेळी धमन्यांमध्ये रक्ताची गाठ होते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात.

कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानतंर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याशिवाय स्ट्रोक आणि अवयव निकामी होऊ शकतात. हा धोका साधारण श्वसनाचा त्रास असलेल्या कोरोनाग्रस्तांना जास्त असतो. कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यावेळी एक प्रोटीन तयार करते. यामुळे रक्तवाहिन्यांना धोका पोहोचतो. (Covid-19 not just lung disease also cause dangerous blood clots)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी

Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू

कोरोना विषाणू आणि टायफॉइडच्या लक्षणांमध्ये गोंधळ? जाणून घ्या यातील फरक आणि त्यावरील उपाय