Health Tips: शरीरालाच नव्हे, किडनीला हानी; पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा

| Updated on: Dec 13, 2021 | 8:47 PM

पाण्यामध्ये शीतलतेचे तत्व सामावलेले असते आणि पोटात उर्जेचे स्वरुप तप्त असते. जेवणावेळी पाणी पिल्यामुळे अग्नी शांत होतो. ज्यामुळे अधिकाधिक खाण्याची इच्छा बळावते. एवढंच नव्हे जेवणादरम्यान पाणी पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्या देखील तुम्हाला ग्रासू शकते.

Health Tips: शरीरालाच नव्हे, किडनीला हानी; पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा
Follow us on

मुंबई : शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची मानली जाते. पोषक घटकांच्या वहनासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सा पद्धतीत पाण्याचे शास्त्रीय महत्व विशद करण्यात आले आहे. त्यासोबतच शरीराला आवश्यक पर्याप्त पाण्याचे प्रमाण व सेवनाच्या पद्धतींविषयी शास्त्रोक्त माहिती प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण दिवसात केवळ एक ग्लास पाणी पिणाऱ्या व्यक्तींना कालांतराने आरोग्याच्या जटिल समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीचा देखील पचनसंस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

पाण्याचं अल्प सेवन, विकारांना आमंत्रण

शरीरात अत्यल्प प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागते. तुम्ही जेवणापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी प्राशन करत असल्यास किंवा जेवणादरम्यान पाणी पिण्याची सवय असल्यास पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. आयुर्वेदानुसार अशा सवयींमुळे पोटाच्या अन्नाच्या स्थितीवर थेट परिणाम जाणवतो. पाण्यामध्ये शीतलतेचे तत्व सामावलेले असते आणि पोटात उर्जेचे स्वरुप तप्त असते. जेवणावेळी पाणी पिल्यामुळे अग्नी शांत होतो. ज्यामुळे अधिकाधिक खाण्याची इच्छा बळावते. एवढंच नव्हे जेवणादरम्यान पाणी पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्या देखील तुम्हाला ग्रासू शकते.

सवयींचा स्वीकार, आरोग्याचा निर्धार

– एकाचवेळी एक ग्लास कधीही पिऊ नका. सावकाशपणे पाणी प्राशन करा.

-जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर तत्काळ पाणी कधीही पिऊ नका. त्यामुळे तुमच्या शरीरातील गॅस्ट्रिक ज्यूसचे विघटन होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचे पचन व अवशोषणात जटिलता निर्माण होते.

– जर तुम्ही तहानलेले असाल, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.

-जेवणावेळी तहान लागल्यास ग्लासभर पाण्याऐवजी एक-एक घोट पाणी प्या.

चुकीचा प्रघात,किडनीवर आघात:

बहुतांश लोक धावपळीत उभ्यानेच पाणी पितात. उभ्याने पाणी पिल्यामुळे आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. उभ्याने पाणी पिल्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर मोठा परिणाम जाणवतो. तुमच्या पचनसंस्थेतून थेट मार्गक्रमण होऊन पाण्याचे उत्सर्जन होते. शरीरातील आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचे पाण्यावाटे मार्गक्रमण होत नाही. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता आणि अनावश्यक पदार्थांचे उत्सर्जन करणाऱ्या मूत्राशयाच्या क्रियेचा वेग मंदावू शकतो.

इतर बातम्या

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या…

घरी पार्टी आहे मग करा ‘हे’ सोपे स्नॅक्स नक्की ट्राय करा