औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या…

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत?  औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या...
Medicine

अनेक लोक दुधासह औषध घेण्याची शिफारस करतात. पण तज्ज्ञ असं प्रकारे औषधं घेण्यास नकार देतात. दूध आणि ज्यूससोबत औषध का घेऊ नये आणि औषधांच्या पानांवर लाल रेषा का केली जाते? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे..

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 13, 2021 | 2:46 PM

मुंबई : औषधे कोमट दुधासोबत घ्यावीत, असं अनेक लोकांचं म्हणं असतात. अशा प्रकारे औषधं घेतल्याने अधिक चांगले परिणाम दिसून येतात. तसंच  त्यांचा प्रभाव चांगला होतो. पण वैज्ञानिकदृष्टी अशा प्रकारे औषध घेणे योग्य नसल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेकवेळा रुग्ण चहा, दूध आणि ज्यूससोबत औषधे घेतात. पण अशा प्रकारे औषधं घेतल्यास औषधांचा परिणाम उलटू शकतो. दूध आणि ज्यूससोबत औषध का घेऊ नये आणि औषधांच्या पानांवर लाल रेषा का केली जाते.

दूधासोबत का औषध घेऊ नये?

जर्मन असोसिएशन ऑफ फार्मासिस्टच्या प्रवक्त्या उर्सुला सेलरबर्ग सांगतात की, दूध आणि ज्यूस यासारखी पेये औषधाचा प्रभाव कमी करू शकतात. असा विचार करा. दुधात कॅल्शियम असते जे औषधात असलेले औषध रक्तात जाण्यापासून रोखू शकते. त्यामुळे औषधाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

ज्यूससोबत औषध घेणे योग्य आहे का?

उर्सुला सेलरबर्ग म्हणतात, काही लोकं ज्यूससोबत औषधे घेतात, असे करू नका. हा रस शरीरात पोहोचतो आणि अशा एन्झाइमला प्रतिबंधित करतो ज्यामुळे औषध शरीरात विरघळण्यास मदत होते. म्हणून, औषधाचा प्रभाव आणखी कमी होऊ शकतो. किंवा औषध उशिरा परिणाम दर्शवू शकतो. म्हणून, पाण्याबरोबर औषधे घेणे हा एक चांगला मार्ग आहे.

औषधांच्या पानांवर लाल रेषा का असते?

आता आपण जाणून घेऊयात औषधांच्या पानांवर लाल रेघ का असते. लाल रेषा बहुतेक अँटीबायोटिक आणि इतर काही औषधांच्या पानांवर आढळते. या लाल रेघाचा अर्थ म्हणजे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत घेता येत नाही. त्याचा वापर स्वत:च्या इच्छेने करू नये, यासाठी आरोग्य मंत्रालयानेही लोकांना जागरूक करण्यासाठी हा लाल रेषचा अलर्ट जारी केला होता.

औषध अशाप्रकारे घेऊ नका!

रिकाम्या पोटी औषध न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पोटात जळजळ होणे. अशी काही औषधे आहेत जी रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ते रिकाम्या पोटी घेणे टाळा. याशिवाय औषधे नेहमी प्रिस्क्रिप्शननुसारच घ्यावीत.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें