Skin Care Tips : चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

Skin Care Tips : चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!
त्वचा

तणावामुळे केवळ आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही तर त्यामुळे चेहऱ्याची चमकही कमी होते. चमकदार त्वचेसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा प्रभाव फार कमी काळ टिकतो. अशा परिस्थितीत, चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स देखील फॉलो करू शकता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 13, 2021 | 6:00 AM

मुंबई : तणावामुळे (Stress) केवळ आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही तर त्यामुळे चेहऱ्याची चमकही कमी होते. चमकदार त्वचेसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा प्रभाव फार कमी काळ टिकतो. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स देखील फॉलो करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होईल.

पाणी प्या

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. हे केवळ तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठीच नाही तर तुमची त्वचा देखील हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हे त्वचेशी संबंधित समस्या जसे की कोरडेपणा आणि खाज दूर करते. त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी दररोज हलके मॉइश्चरायझर वापरा.

ध्यान आणि योगासने

तणाव आणि नकारात्मकता केवळ मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक आरोग्याच्या समस्या देखील वाढवू शकते. अशा परिस्थितीत नियमितपणे योगासने आणि ध्यान करा. त्यामुळे तणाव आणि मानसिक समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

फेशियल

त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित फेशियल आणि क्लीनअप आवश्यक आहे. बेसन, हळद, दही आणि मध यासारखे साधे घरगुती उपाय तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतात.

आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा

निरोगी त्वचेसाठी आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तुमच्या शरीराला सर्व महत्त्वाचे पोषक आणि जीवनसत्त्वे प्रदान करण्यासाठी तुम्ही अनेक पदार्थांचा समावेश करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें