पायाच्या तळव्याला देशी तुपाने मालिश करायचे फायदे काय? का करावी मालिश? तुपाला पर्याय काय?

कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल. अनेक स्किन केअर तज्ज्ञांच्या मते जर आपण देशी तुपाने पायाच्या तळव्याला मसाज केला तर चेहऱ्यावर जबरदस्त चमक येऊ शकते. शतकानुशतके वापरली जाणारी ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे.

पायाच्या तळव्याला देशी तुपाने मालिश करायचे फायदे काय? का करावी मालिश? तुपाला पर्याय काय?
Malish on footImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 1:40 PM

मुंबई: आपल्यापैकी अनेकजण त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु अपेक्षित परिणाम मिळत नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आपली त्वचा पायाच्या तळव्याशी जोडलेली आहे तर? कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल. अनेक स्किन केअर तज्ज्ञांच्या मते जर आपण देशी तुपाने पायाच्या तळव्याला मसाज केला तर चेहऱ्यावर जबरदस्त चमक येऊ शकते. शतकानुशतके वापरली जाणारी ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. असे केल्याने त्वचेला फायदा तर होतोच, शिवाय इतरही अनेक समस्या दूर होतात.

तळव्याला देशी तूप चोळण्याचे फायदे

आपण बरेचदा देसी तूपाचे सेवन करू शकता परंतु प्रत्येकजण त्वचेच्या फायद्यासाठी त्याचा वापर करत नाही. चला तर मग जाणून घेऊया रात्री हलक्या हाताने पायाच्या तळव्यावर तूप चोळल्यास आरोग्यास कोणते फायदे होतात.

  1. पायाच्या तळव्याला तुपाने मालिश केल्याने चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते, तसेच त्वचेच्या अनेक समस्याही दूर होतील.
  2. ज्यांना रात्री शांत झोप येत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी तळव्याला देशी तुपाने मसाज करावा.
  3. जर तुमचा लाईफ पार्टनर झोपताना जोरजोरात घोरत असेल तर आजपासून त्यांच्या तळपायाला तूप लावा.
  4. ज्यांना अपचन किंवा पोटाच्या समस्येने त्रास होतो त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते.
  5. अंथरुणावर झोपण्यापूर्वी तुपाने पायाची मालिश केल्यास आराम मिळेल आणि मग टेन्शन दूर होईल.
  6. फार कमी लोकांना माहित आहे की ही पद्धत वापरून लठ्ठपणा देखील कमी केला जाऊ शकतो.

तुपाची मालिश कशी करावी?

रात्री झोपण्यापूर्वी देशी तूप तळहातात चांगले चोळावे आणि नंतर पायाच्या तळव्याला मसाज करावा. पाय उबदार होईपर्यंत तूप चोळत राहा. मग आरामात झोपा, त्याचा परिणाम काही दिवसात स्पष्ट दिसेल.

तुपाला पर्याय काय?

तूप खूप महाग आहे, म्हणून प्रत्येकजण दररोज हे दुग्धजन्य पदार्थ वापरू शकत नाही, त्याऐवजी आपण नारळ तेल किंवा कोकम बटर देखील वापरू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.