कोरोनापासून वाचण्यासाठी N95 मास्कची चर्चा, असा ओळखा बनावट आणि खऱ्या मास्कमधील फरक

| Updated on: Jan 13, 2022 | 6:15 AM

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. डेल्टा सोबतच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमितपणे मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो.

कोरोनापासून वाचण्यासाठी N95 मास्कची चर्चा, असा ओळखा बनावट आणि खऱ्या मास्कमधील फरक
मास्क
Follow us on

N95 Mask : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. डेल्टा सोबतच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनाच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिगंचे पालन, गर्दी न करणे, अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडणे, हात वारंवार स्वच्छ धुणे यासोबतच घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करणे याचा समावेश होतो. कोरोनाला आळा घालण्यासाठी N95 मास्कच सर्वात चांगले असल्याची चर्चा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून होत आहे. आता तर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनपासून बचावासाठी देखील N95 मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. या मास्कची मागणी मोठ्याप्रमाणात वाढल्याने बाजारात अनेक बनावट एन 95 मास्क देखील विक्रीस आले आहेत. आज आपण बनावट आणि खऱ्या एन 95 मास्कमध्ये काय फरक असतो? हेच जाणून घेणार आहोत.

चष्म्याच्या मदतीने चेक करा मास्क

FDA कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार तुम्ही जेव्हा एन 95 मास्क घालतात, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचा सर्व भाग त्यामध्ये कव्हर होतो. त्यामुळे तुम्हाला जर बनावट आणि खरे एन 95 मास्क चेक करायचे असेल तर डोळ्यावर चष्मा घाला आणि श्वास घ्या. जर तुमच्या चष्माच्या काचावर वाफ जमा झाली तर तो मास्क बनावट आहे असे समाजावे.

मास्कवरील डिस्क्रिप्शन वाचा

तुमचा मास्क जर बनावट असेल तर तुमच्या चष्म्यावर वाफ जमा होईलच, त्याचबरोबर तुम्ही मास्कवरील डिस्क्रिप्शन वाचून देखील मास्क हे बनावट आहे की खरे हे ओळखू शकता. बाजारात अनेक प्रकारचे मास्क भेटतात. जे N95 च्या नावाने विकले जातात. आपन देखील जादा किंमत देऊन अशा मास्कची खरेदी करतो. मात्र ते बनावट निघाल्यास आपली फसवणूक होते. चायना आणि काही कोरियन कंपनीकडून देखील हुबेहुब एन 95 मास्क सारखे दिसणारे मास्क विकण्यात येतात. तेव्हा जर तु्म्ही त्या प्रोडक्टवरील माहिती वाचली तर तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकाल.

संबंधित बातम्या

चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!

N95 मास्क खरेदी करताय? नकली N95 मास्क फसगतीपासून स्वतःला असे वाचवा!!

Pune corona : कोरोनामुळे मुंबईनंतर पुण्याला धडकी, दोन जम्बो कोविड सेंटर सुरू करणार