N95 मास्क खरेदी करताय? नकली N95 मास्क फसगतीपासून स्वतःला असे वाचवा!!

N95 मास्क विकत घेऊन सुद्धा अनेकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे यामागे खरे कारण आहे ते म्हणजे नकली N95 मास्क म्हणूनच अशा वेळी आपल्या मनामध्ये सुद्धा या N95 मास्क बद्दल शंका निर्माण होत आहे. जर तुमच्या मनामध्ये सुद्धा N95 मास्क बद्दल शंका निर्माण होत असेल व खरा N95 मास्क कसा ओळखता यावा तर अशा वेळी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी या मास्कबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

N95 मास्क खरेदी करताय? नकली N95 मास्क फसगतीपासून स्वतःला असे वाचवा!!
mask

कसे ओळखाल N95 मास्क ?

N95 Mask Type : गेल्या अनेक दिवसापासून सगळीकडे कोरोना (Corona) ची झालेली वाढ चिंता व्यक्त करणारी आहे. कोरोना सगळीकडे प्रचंड वेगाने पसरत आहे आणि म्हणूनच अशा वेळी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, आता कुठे आपण सगळेजण सावरत होतो परंतु तिसरी लाट आता पुन्हा नव्याने आपला दरवाजा ठोठावत यावेळी सुद्धा कोरोनाचा नवीन अवतार आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध झालेले आहोत परंतु या वेळेस फक्त आपल्याला हात साबणाने स्वच्छ धुवायचे नाही , सॅनीटायझरने तर हात धुवायचे आहेच त्याचबरोबर आपल्याला योग्य प्रकारे मास्क वापरून आपल्या शरीराची काळजी सुद्धा घ्यायची आहे. सध्याच्या काळामध्ये N95 मास्कबद्दल खूप चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा मास्क प्रत्येकाने वापरावा असे सल्ले सुद्धा तज्ञ मंडळीद्वारे दिले जात आहेत.
म्हणुन या मास्कची विक्री बाजारामध्ये जोर धरत आहे परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना बाजारामध्ये नकली मास्क सुद्धा मोठ्याने विकण्यास आलेले आहे म्हणूनच अशा वेळी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये खरा मास्क ओळखावा तरी कसा? घडणाऱ्या या सगळ्या भेसळीमुळे जनता गोंधळात आलेली आहे.

या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही जर कोणतीही काळजी न घेता बाजारामध्ये मिळत असणारे नकली मास्क विकत घेत असाल तर तुमच्या जीवाला भविष्यात धोका उद्भवण्याची शक्यता आहे. बहुतेक वेळा आपण सगळेजण मास्क लावल्यावर कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही आणि अशा वेळीच हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतो. अशातच प्रश्न निर्माण होतो की नेमका खरा मास्क कसा ओळखायचा तरी कसा?.. कारण की बाजारामध्ये खऱ्या सारखाच दिसणारा नकली मास्क सुद्धा विकायला ठेवलेला आहे.

व्हायरसला शरीरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो N95 मास्क..

कोरोना वायरस हा नाकाद्वारे आपल्या गळ्यामध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू आपल्या फुफ्फुसांमध्ये आणि आपल्या पचनसंस्थे मध्ये प्रवेश करतो म्हणूनच सुरुवातीच्या काळापासूनच तज्ञ मंडळी आपल्याला योग्य प्रतीचा मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. अनेक डॉक्टर N95 मास्क व डबल मास्किंग वापरण्याचा सल्ला देत आहेत. अशातच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून N95 मास्क अत्यंत लाभदायी ठरत आहे तसेच आपल्या शरीरासाठी संरक्षक कवच सुद्धा बनत आहेत या मास्क मागील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की हा मास्क आपल्या चेहऱ्याला अगदी चिटकून फिट बसतो.

चष्माच्या आधारे ओळखा नकली मास्क..

FDA च्या माहितीनुसार या मास्कचे किनारे चेहरा आणि तोंडाच्या चारही बाजूने बंद असतात. तज्ञ मंडळी अशा वेळी सांगतात क, जर तुम्हाला खरा मास्क व नकली मास्क यांच्यातील फरक बद्दल जाणून घ्यायचे असेल तर चष्मा घालून श्वास घ्या, मास्क घातल्यावर जर तुमच्या चष्म्याच्या काचेवर जर बाष्प म्हणजे काच जर धूसर झाल्यास याचा अर्थ असा की या मास्कमधून हवा बाहेर जात आहे आणि तुम्ही जो मास्क चेहऱ्यावर लावलेला आहे तो खरा नसून नकली आहे.

प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन चेक करा

जर तुम्ही कपड्याचा मास्क किंवा सर्जिकल मास्क घालून जेव्हा बाहेर जाता तेव्हा चष्माच्या काचेवर श्वासाच्या वाफेमुळे धुसरपणा आलेला पाहायला मिळतो. बाजारामध्ये N95 मास्कचे चाइनीज आणि कोरियन वर्जन सुद्धा पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही हा मास्क ऑनलाइन पद्धतीने विकत घेत असाल तर अशा वेळी ब्रँडचे नाव CDC इनडेक्सवर चेक करा,असे केल्याने आपल्याला कळून जाते की या मास्कला NIOSH ची मान्यता मिळाली आहे की नाही, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला कळून जाते म्हणूनच या लेखामध्ये सांगितलेली माहिती जर आपण लक्षात घेतली तर सहज रित्या खरा असलेला N95 मास्क व नकली असलेला N 95 मास्क यातील फरक आपण जाणून घेऊ शकतो आणि आपली फसगत होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो आणि परिणामी या भयंकर विषाणूपासून स्वतःचे रक्षण सुद्धा करू शकतो.

Pune corona : कोरोनामुळे मुंबईनंतर पुण्याला धडकी, दोन जम्बो कोविड सेंटर सुरू करणार

एक-दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर

मोनलूपिरावीर औषधांचे साईड इफेक्ट्स, वापर न करण्याचा निर्णय, तिसऱ्या लाटेत तारणहार कोण?

Published On - 11:19 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI