चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 11:29 PM

नवी दिल्ली : चलनी नोटांतून कोरोना विषाणूंच्या (COVID VIRUS) प्रसाराची शक्यता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारला याविषयीचे स्पष्टीकरण मागविले आहे. केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका न घेतल्याबद्दल कॅटने खेद व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया आणि आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांच्याकडे चलनी नोटांतून (currency note) होणाऱ्या विषाणूंच्या प्रसाराविषयी मत मागितले आहे. कोट्यावधी लोकांचा चलनी नोटांशी संपर्क येतो. त्यामुळे चलनी नोटांवर विषाणुविषयी केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार किंवा आरबीआयने अद्याप अधिकृत खुलासा केला नसल्याने संघटनेने आश्चर्च व्यक्त केले आहे.

सरकारचा अबोला, कॅटची नाराजी

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

कोविड विषाणूचा चलनी नोटेद्वारे होणाऱ्या प्रसाराविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कोविड विषाणू प्रसाराचे अनेक माध्यमे आहेत. त्यापैकी चलनी नोटा देखील माध्यम ठरू शकते. लाखो व्यापारी चलनी नोटांच्या संपर्कात असतात. चलनी नोटांतून विषाणू प्रसार होत असल्याचे सिद्ध झाल्यास लाखो व्यापारी आणि ग्राहकांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. सर्वप्रथम 2 सप्टेंबर, 2018 रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सर्वप्रथम स्पष्टीकरण मागविले. त्यानंतर वर्ष 2019 , वर्ष 2020 आणि वर्ष 2021 मध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरला अनेकवेळा स्मरणपत्रे पाठविली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही. त्यामुळे महत्वपूर्ण मुद्द्यावर मौन का असा सवाल कॅटच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.

विषाणू प्रसाराचा दावे-प्रतिदावे

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात चलनी नोटांतून होणाऱ्या विषाणू प्रसाराचा दावा केला आहे. त्यासाठी देशात तसेच जागतिक स्तरावरील विविध संशोधनांचे संदर्भ दिले आहेत. केवळ कोविड नव्हे तर अन्य रोगांना कारण ठरणाऱ्या विषाणूंचा प्रसार नोटांमार्फत घडत असल्याचा दावा कॅटने केला आहे. जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाईड सायन्सेस, इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मा अँड बायो सायन्स, इंटरनॅशनल जर्नल ऑफ अडवॉन्स्ड रिसर्चच्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. ग्राहकांदरम्यान चलनी नोटांच्या हस्तांतरणावेळी विषाणूंचे संक्रमण होत असल्याचे वरील निष्कर्षातून सिद्ध झाल्याचा दावा कॅटने पत्राद्वारे केला आहे.

संबंधित बातम्या :

N95 मास्क खरेदी करताय? नकली N95 मास्क फसगतीपासून स्वतःला असे वाचवा!!

एक-दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर

मोनलूपिरावीर औषधांचे साईड इफेक्ट्स, वापर न करण्याचा निर्णय, तिसऱ्या लाटेत तारणहार कोण?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.