Health Issues: तुम्हालाही निरोगी दीर्घायुष्य हवे आहे? रुटीनध्ये करा ‘हे’ बदल… जगाल 75 वर्षांहून अधिक!

| Updated on: Sep 04, 2022 | 7:42 PM

काही घरगुती उपाय, लहानपणापासूनच केले तर, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि तुम्हाला दीर्घायुष्य देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या दिनश्‍चर्येत आणि आहारात काही बदल करायचे आहेत जे तुमचे दीर्घायुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Health Issues: तुम्हालाही निरोगी दीर्घायुष्य हवे आहे? रुटीनध्ये करा ‘हे’ बदल... जगाल 75 वर्षांहून अधिक!
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात का? ज्यांना असे वाटते की, आजच्या काळात लोकांना निरोगी राहणे किंवा दीर्घकाळ जगणे कठीण आहे? जर होय, तर तुम्ही असे एकटे नाही आहात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तरुण वयात लोकांमध्ये अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोका (Risk of diseases) वाढत असल्याने, 75 वर्षांहून अधिक जगणे लोकांसाठी निश्चितच कठीण होत आहे. मात्र, नैसर्गिक आणि पर्यावरणीय घटकांसोबतच आपली गोंधळलेली जीवनशैलीही यात मोठा हातभार लावते. काळाच्या ओघात आपण आपली जीवनशैली आणि आहार (Lifestyle and diet) असा बनवला आहे की, तो आपल्याला लहान वयातच आजारी बनवत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर आपण रुटीनमध्ये वृद्धत्वविरोधी (Anti-aging routine) काही उपायांचे पालन केले तर दीर्घायुष्य मिळणे इतके अवघड नाही. खरे तर लोकांनी लहानपणापासूनच या उपायांकडे लक्ष द्यायला हवे.

झोपेचे चक्र निश्चित करा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी सर्व लोकांनी त्यांच्या झोपेची गुणवत्ता आणि कालावधी निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली झोप तुम्हाला दीर्घकाळ जगण्यास मदत करेल आणि अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करेल. या बायोहॅकसाठी काही गोष्टी लक्षात ठेवा – मोबाईल फोन अजिबात वापरू नका, झोपण्यापूर्वी कॉफी किंवा अल्कोहोल इत्यादी सेवन करू नका, ते तुमच्या झोपेच्या चक्रात अडथळा आणतात. दीर्घकाळ झोपेच्या समस्यांमुळे अनेक गंभीर आणि जुनाट आजारांचा धोका वाढतो.

शारीरिक निष्क्रियता तुमचा शत्रू?

जर तुम्हाला वाटत असेल की, शरीराला जास्तीत जास्त विश्रांती देणे गरजेचे आणि फायदेशीर आहे, तर काळजी घ्या, ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. शारीरिक निष्क्रियतेमुळे हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो, ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो. अशा समस्या टाळण्यासाठी नियमित योगाभ्यासाची सवय लावा. नियमित व्यायाम तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आणि वृद्धत्वविरोधी प्रभाव वाढवून दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहे.

वनस्पती आधारित आहार घ्या

ज्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य हवे आहे त्यांच्यासाठी योग्य आहार निवडणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये वनस्पती-आधारित पदार्थांचे सेवन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वनस्पती-आधारित आहार शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे पुरवण्यासाठी उपयुक्त आहे. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या-हिरव्या भाज्यांचा समावेश जरूर करा, ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

अल्कोहोल-धूम्रपान पूर्णपणे टाळा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अभ्यासातून असे आढळून आले आहे की, मद्यपानापासून दूर राहिल्याने अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात जे गेल्या काही वर्षांत वाढत्या वयोमानानुसार मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. अल्कोहोल-धूम्रपानामुळे फुफ्फुस आणि हृदयाच्या आरोग्यास गंभीर नुकसान होते. याशिवाय कॅफिनचे सेवनही कमी प्रमाणात करावे. दुपारी ३ नंतर कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये टाळा, कारण यामुळे झोपेचे चक्र बिघडू शकते.