
आजकाल बदललेली लाईफ स्टाईलने चुकीचा आहार, कमी पाणी पिणे, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे युरिक एसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. युरिक एसिड एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो शरीरात प्युरीनचे विघटन झाल्यावर तयार होतो. जेव्हा हा जास्त प्रमाणात तयार होतो, तेव्हा किडनी त्यास बाहेर काढू शकत नाही.तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी रामदेव बाबा यांनी काही सोपी योगासने सांगितली आहेत. जी युरिक एसिड कंट्रोल करण्यास मदत करतात. चला तर पाहूयात कोणती ती आसने आहेत.
युरिक एसिड वाढल्यानंतर सांध्यात तीव्र वेदना होतात, सूज येते किंवा चालताना त्रास होतो. आणि रात्री वेदना अधिक प्रमाणात येतात. अनेकदा याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सांधेदुखी, किडनी स्टोन आणि किडनी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे याकडे वेळीच लक्ष द्यावे. रामदेव बाबा यांनी सांगितलेली काही योगासने केल्यानंतर मेटाबॉलिझ्म सुधारुन किडनी फंक्शन मजबूत होऊन युरिक एसिडला नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते. चला तर पाहूयात कोणती योगासने या समस्येवर आराम देतात…
युरिक एसिडमध्ये ही योगासने फायदेशीर
योगगुरु रामदेव बाबा सांगतात की त्रिकोणासन संपूर्ण शरीरात ब्लड फ्लो चांगला करतो. आणि स्नायूतील ताठरता कमी करते. कंबर, नितंब आणि पायांची स्ट्रेचिंग वाढवून त्या सांध्यातील जमलेले युरिक एसिड क्रिस्टल कमी करण्यास मदत करते, जेथे जास्त वेदना होत असतात. या आसनाचा नियमित अभ्यास केल्याने शरीराचा लवचिकपणा वाढतो आणि सुज कमी होते. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो.
भुजंगासनात माकड हाड मजबूत होते. आणि पोटातील अवयवांवर हलका दाब पडून पचन आणि मेटाबॉलिझ्म चांगले होते. चांगल्या मेटबॉलिझ्म युरिक एसिड तयार करण्याची प्रक्रिया नियंत्रित करण्यास मदत करते. हे आसन किडनीच्या कार्याला देखील सपोर्ट करते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिनला चांगल्या प्रकारे बाहेर काढते.
पवनमुक्तासन गॅस,अपचन आणि पोट फुगणे हे त्रास दूर होऊन पचन प्रक्रिया चांगली होते. यामुळे प्युरिन पचन दरम्यान शरीरात विघटीत होते आणि चांगले डायजेशन युरिक एसिड नियंत्रित करण्यास मदत करते. हे आसन नितंब आणि गुडघ्याच्या जवळील वेदना देखील कमी करते.
शलभासन पोट, कंबर आणि मांड्यातील मांस पेशींना मजबूत करते आणि ब्लड फ्लो वाढवते. हे आसन खास करुन किडनी आणि लिव्हरला एक्टीव्ह करते. ज्यामुळे शरीरातील जमलेले टाकाऊ पदार्थ आणि युरिक एसिड चांगल्या पद्धतीने बाहेर पडते. हे आसन सूज कमी करणे आणि सांध्यांचा वेग वाढवण्यास मदत करते.