Urine smell : लघवीतून दुर्गंधी येतेय? ‘ही’ आहेत त्यामागील कारणं..

| Updated on: Feb 26, 2022 | 12:24 PM

Urinary infection symptoms : अनेकदा लघवीतून दुर्गंधी येत असते, उन्हाळ्यात ही समस्या सामान्य असली तरी अनेक वेळा लघवीची ही तीव्र दुर्गंधी डोकेदुखी ठरत असते. या दुर्गंधीमागे अनेक आजाराची लक्षणे असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Urine smell : लघवीतून दुर्गंधी येतेय? ‘ही’ आहेत त्यामागील कारणं..
लघूशंका/प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us on

Urinary infection symptoms : लघवीतून दुर्गंधी (Urine smell) आल्यास आपण शरीरात पाणी कमी पडले (Dehydration) असेल असे मानून त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. अनेक वेळा स्वच्छतागृहात जाउन आल्यानंतर त्या ठिकाणी तीव्र दुर्घंधी पसरत असते. खासकरून उन्हाळ्यात ही समस्या निर्माण झाल्यास कदाचित या मागे पाण्याची कमतरता हे कारण असू शकते. तसेच सार्वजनिक शौचालयासारख्या ठिकाणी, जिथे जास्त लोक लघवी करतात, तिथे काही वेळा लघवीचा असा वास येतो जो सहन करणेही कठीण होते. लघवीतून दुर्गंधी येणे हे अगदी सामान्य आहे, परंतु काहीवेळा हीच दुर्गंध काही आजाराचे लक्षणदेखील (Symptoms) असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आपणास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वारंवार लघवीतून दुर्गंधी येत असल्यास याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक ठरत असते.

1) यूटीआय

महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ही समस्या आढळून येत असते. जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा ही समस्या भेडसावते. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रपिंड, मूत्राशय आणि त्याच्याशी जोडलेल्या नळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्याची वेळीच तपासणी केली नाही, तर संसर्ग किडनीमध्येही पसरून त्या ठिकाणी नुकसान होउ शकते.

2) पाण्याची कमतरता

आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. ज्या वेळी आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, अशा वेळी शरीरातील विषारी घटक उत्सर्जित होत नाहीत. त्यामुळे हे टाकाऊ पदार्थ सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत, परिणामी लघवीला तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत असतो. त्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे आवश्‍यक असते.

3) कॉफीचे अतिसेवन

कॉफीचे जास्त सेवन केल्याने लघवीला दुर्गंधी येऊ शकते. कॉफीमुळेही निर्जलीकरण होते, त्यामुळे आपल्या लघवीतून दुर्गंधी येऊ शकते.

4) मधुमेह

मधुमेही लोकांच्या लघवीतूनही दुर्गंधी येऊ शकते. मधुमेही रुग्णांच्या शरीरात साखर पचवण्याची क्षमता नसल्याने त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंधी येते. मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागत असते. त्यातून दुर्गंधी वाढत असते.

5) एसटीआय

लैंगिक संक्रमित संसर्ग किंवा एसटीआय हेदेखील दुर्गंधीयुक्त लघवीचे एक कारण असू शकते. कधीकधी या संक्रमणांमुळे मूत्रमार्गात जळजळ होऊन यामुळे लघवीला दुर्गंध येत असतो. महिलांच्या गुप्तांगामध्ये होत असलेल्या जळजळीमुळेही लघवीला दुर्गंधी येऊ शकते.

6) यीस्ट इन्फेक्शन

केंडिडा नावाची बुरशी सहसा आपल्या त्वचेवर असते. ही बुरशी महिलांच्या अवघड भागासह शरीराच्या कोणत्याही भागात आढळू शकते. जेव्हा ही बुरशी खूप जास्त प्रमाणात तयार होते तेव्हा शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ओले कपडे घालणे किंवा घाणीत राहणे यासह यीस्ट इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. पुरुषांपेक्षा महिलांना यीस्ट इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे लघवी करताना दुर्गंधी येते. यीस्ट संसर्गाची लक्षणे पुरुषांमध्येही आढळतात, परंतु ती महिलांइतकी तीव्र नसतात, त्यामुळे शारीरिक स्वच्छता महत्त्वाची असते.

आणखी वाचा :

कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम

‘पिकू’तील बिग बींप्रमाणे तुम्हालाही त्रास होतो? बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय जाणून घ्या

Health care : तुळस आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर, मात्र या समस्यांमध्ये अजिबात सेवन करू नका!