कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम

गेल्या काही वर्षांपासून कर्करोग ही गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे. याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा रोग असाध्य होतो. वेळीच लक्षणे ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास हा आजार बरा देखील होऊ शकतो.

कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 10:57 AM

वाढते प्रदूषण, बदलती जीवनपध्दती, (Lifestyle) खानपान सवयी, व्यायामाचा अभाव आदी सवयींमुळे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाचे (cancer) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक जण कर्करोगाच्या लक्षणांकडे (symptoms) दुर्लक्ष करतात. यामुळे हा आजार हळूहळू शरीराच्या एका भागातून दुसरीकडे जातो. वेळीच लक्ष न दिल्यास मृत्यू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कर्करोगावर अद्यापपर्यंत डॉक्टरांना अचूक उपचार करता आलेले नाहीत. लोकांना या आजाराची माहिती होईपर्यंत तो असाध्य अवस्थेत पोहोचतो. त्यानंतर रुग्णाला जगणे कठीण होते. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने या आजाराबद्दल जाणून घेणे आणि लक्षणे दिसताच त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. त्यासोबत हा आहार होऊ नये म्हणून, पुरेशी झोप, सकस आहार, व्यायाम आदी उपाययोजना करणे आवश्‍यक आहेत.

कर्करोग काय आहे?

कर्करोग या आजारामध्ये शरीराच्या कोणत्याही भागाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढत जातात. यानंतर कर्करोग शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरतो. कर्करोगाची लक्षणे सुरुवातीलाच ओळखली, तर आपण त्याला धोकादायक स्थितीपर्यंत जाण्यापासून रोखू शकतो, आपल्या शरीरात खराब पेशींचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती काम करीत असते. परंतु रोगप्रतिकारशक्ती कमकूवत झाल्यास खराब पेशींची संख्या अमर्यादपणे वाढत जाते व कर्करोग होतो.

ही आहेत लक्षणे

1) शरीरावर अनेक ठिकाणी चामखीळ येते असतात. चामखीळात काही बदल दिसले किंवा नवीन चामखीळ जाणवत असेल तर याकडे गांभीर्याने पहावे.

2) काही वेळा चामड्यांमधून रक्तस्त्राव किंवा ढेकूळ निर्माण होण्याची लक्षणेही दिसतात. ही सर्व लक्षणे कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

3) जर एखाद्या व्यक्तीला तंबाखू खाण्याची सवय असेल, परंतु आता त्याला त्याचा त्रास होत असेल किंवा डोकेदुखी होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.

4) एखाद्या व्यक्तीला अनेक महिने खोकला असेल. जर त्याला कफमधून रक्त येणे, वजन कमी होणे किंवा आवाजात बदल होण्याची समस्या असेल तर असे कोणतेही लक्षण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचण्या कराव्यात.

5) शरीरात एखादी गाठ तयार झाली असेल, जी सतत मोठी होत असेल, तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर, ती गाठ काढून टाकणे हा एक चांगला उपाय आहे.

6) एखाद्या व्यक्तीच्या पोटात खूप दुखत असेल तर. जर त्याला कावीळ झाली असेल तसेच वजन कमी झाल्याची तक्रार असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.

7) एखाद्या व्यक्तीला लघवी करताना वेदना न होता रक्त येत असेल, कोणत्याही कारणाशिवाय अशक्तपणा येत असेल, तर हे कर्करोगाचे लक्षणे असू शकतात.

यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यास उशीर करू नका. कर्करोग पहिल्या टप्प्यातच ओळखता आला तर तो मुळापासून नष्ट होऊ शकतो. दुसऱ्या स्टेजला पोहोचल्यावर उपचारात अडचणी येतात आणि तिसऱ्या टप्प्यात हा आजार असाध्य होतो, या आजारात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

संबंधित बातम्या

तुमचे हेअर हीटिंग टूल्समुळे केस झाले खराब…मग परत सुंदर, चमकदार केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…

‘पिकू’तील बिग बींप्रमाणे तुम्हालाही त्रास होतो? बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय जाणून घ्या

Relationship tips: या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.