तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? होऊ शकतात गंभीर आजार

| Updated on: Oct 01, 2022 | 2:17 PM

प्लास्टिकच्य बाटलीत असलेले डीपीए आणि अन्य केमिकल्स आपल्या शरीरात पोहोचण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तुम्ही तांब्याचे भांडे वापरणे उत्तम ठरेल.

तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? होऊ शकतात गंभीर आजार
तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? होऊ शकतात गंभीर आजार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: आपण बऱ्याच वेळेस ऑफिसला किवा वर्कआऊटसाठी जाताना प्लास्टिकच्या बाटलीतून (plastic bottle)पाणी घेऊन जातो. बऱ्याच ठिकाणी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास (plastic glass) वापरले जातात. खरंतर, तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार प्लास्टिक एक पॉलीमर आहे. प्लास्टिक कार्बन, हायड्रोजन ऑक्सिजन आणि क्लोराइड हे सर्व मिळून बनते. त्याशिवाय प्लास्टिकमध्ये बीपी नावाचे एक केमिकल आढळते, जे आपल्या शरीरासाठी अतिशय (bad for health) घातक असते. डॉक्टरांच्या सांगण्यनुसार, जर केमिकल आणि पॉलीमर मध्ये आडळणारी तत्वं आपल्या शरीरात गेली तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.

कॅन्सरचा असू शकतो धोका

तज्ज्ञांच्या सांगण्यानुससार, प्लास्टिकच्या बाटलीत खूप वेळ पाणी ठेवले जाते. ते पाणी एखाद्या व्यक्तीने प्यायल्यास, त्या व्यक्तीला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल गडबड होऊ शकते.

तसेच स्पर्म काऊंटही कमी होतो आणि लिव्हरचे (यकृत) गंभीर नुकसान होऊ शकते. एवढेच नव्हे तर प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे याबबात जागरुक राहणे अतिशय महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

तांब्यांच्या भांड्याचा करा वापर

आजकाल अनेक घरांमध्ये लोकं प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेल्या पाण्याचा वापर करतात. लोकं प्लास्टिकची बाटली अनेक दिवसांपर्यंत फ्रीजमध्येही ठेवतात. प्लास्टिकच्या बाटलीत असलेले डीपीए आणि अन्य केमिकल्स आपल्या शरीरात पोहोचण्याची शक्यता असते.

त्यापेक्षा तुम्ही तांब्याचे भांडे वापरणे उत्तम ठरेल. पूर्वीच्या काळात अनेक लोक तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा वापर करत असत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तांबे हे शरीरासाठी अतिशय पोषक असते. त्यामुळे लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलेच पाणी प्यावे.

भारतात प्लास्टिकचा आहे इतका वापर

सरकारी आकड्यांनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 35 लाख टन प्लास्टिकची निर्मिती होत आहे. येत्या 5 वर्षांत प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने हे दुप्पट होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर 480 अब्ज प्लास्टिक बाटल्यांची विक्री झाली.