Tips To Boost Metabolism: खूप पाणी प्या, मसाल्यांचे सेवन करा, मेटाबॉलिज्म वाढवण्याचे 5 उपाय

| Updated on: Jan 06, 2023 | 5:10 PM

चांगला मेटाबॉलिक रेट (चयापचय दर) हा निरोगी शरीर दर्शवतो. मेटाबॉलिजम सुधारून शरीराचे वजनही निरोगी ठेवता येते.

Tips To Boost Metabolism: खूप पाणी प्या,  मसाल्यांचे सेवन करा, मेटाबॉलिज्म वाढवण्याचे 5 उपाय
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – निरोगी शरीर (health) हवे असेल तर शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी असणे महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहारासोबतच योग्य वजन (weight) राखणेही आवश्यक आहे. बर्‍याच लोकांना चांगला आहार न मिळाल्याने ते अशक्त आणि कमी वजनाचे बनतात, तर काहीजण चुकीच्या खाण्यामुळे लठ्ठ होतात. अशा परिस्थितीत मेटाबॉलिज्म (metabolism) योग्य ठेवणे हा या समस्येवर उपाय ठरू शकतो. चांगले मेटाबॉलिज्म पचन सुधारते आणि शरीर अन्नातून पोषण शोषण्यास सक्षम होते. वाढलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी, शरीरातील मेटाबॉलिजमची काळजी घेतली पाहिजे.

मेटाबॉलिजम वाढवण्याचे व कॅलरी बर्न करण्याचे काही उपाय जाणून घेऊया.

स्वयंपाकाच्या तेलाकडे लक्ष द्या

हे सुद्धा वाचा

मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी मीडिअम चेन ट्रायग्लिसराइड (MCT)वापरा. नारळाच्या तेलासारख्या एमसीटीमध्ये लॉरिक ॲसिड भरपूर असते जो मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी काम करतो.

थंड पाण्याने अंघोळ करा व कॅलरी कमी करा

थंडी वाजल्यामुळे ब्राऊन फॅट ॲक्टिव्हेट होते. गार पाण्याने अंघोळ केल्यामुळे फ्रेश वाटते आणि फिटनेसही वाढतो.

मसल्ससह मेटाबॉलिक रेट वाढवा

मसल्स वाढल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे ग्लुकोजचा योग्य वापर करणे शक्य होते. याशिवाय मसल्स हे ग्लायकोजेन स्टोअर्सचे नियमन करून चरबी जमा होण्यापासून संरक्षण करतात.

पाण्यामुळे सुधारेल मेटाबॉलिज्म

पाणी हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे आहे. एका संशोधनानुसार, चांगल्या मेटाबॉलिज्मसाठी अधिक पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. शरीराच्या वजनानुसार योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

मसालेदार अन्नही गरजेचे

मसाले हे नेहमीच आरोग्याचे शत्रू नसतात, परंतु त्यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन शरीरातील तपकिरी ऍडिपोज टिश्यू आणि ब्राऊन फॅट ॲक्टिव्हेट करते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म रेट दर सुधारतो आणि कॅलरीज कमी होतात.