Health | वर्क फ्रॉम होम करताना या टिप्स फाॅलो करा आणि दुष्परिणामांपासून दूर राहा!

| Updated on: May 19, 2022 | 11:08 AM

घरातून काम करताना तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आगे. दररोज व्यायामासाठी वेळ काढा. जेवल्यानंतर थोडा वेळ चाला. संध्याकाळी जेवल्यानंतर किमान 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचा थकवाही दूर होतो. तसेच सकाळी लवकर जिमला जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Health | वर्क फ्रॉम होम करताना या टिप्स फाॅलो करा आणि दुष्परिणामांपासून दूर राहा!
Image Credit source: istockphoto.com
Follow us on

मुंबई : भारतामध्ये कोरोनाच्या (Corona) केसेस कमी झाल्या आहेत. यामुळे आता जनजीवन पुर्वीप्रमाणे सुरूळीत झाले आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर लोकांना घराबाहेर पडणे देखील शक्य नव्हते. यामुळे वर्क फ्राॅम होम अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले. मात्र, आता वर्क फ्राॅम होमची (Work from home) पध्दत रूळत चालली आहे. यामुळे अजूनही अनेक कर्मचारी घरूनच काम करत आहेत. मात्र, वर्क फ्राॅम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ताण खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत अनेक तास एकाच जागी बसून राहिल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही एकाच जागी बसून सतत काम करत असाल तर निरोगी (Healthy) राहण्यासाठी काही खास टिप्स फाॅलो करायला हव्यात. चला जाणून घेऊया तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता.

व्यायाम

घरातून काम करताना तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आगे. दररोज व्यायामासाठी वेळ काढा. जेवल्यानंतर थोडा वेळ चाला. संध्याकाळी जेवल्यानंतर किमान 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचा थकवाही दूर होतो. तसेच सकाळी लवकर जिमला जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

योगा करा

घरातून काम करताना आपण जास्त वेळ घरीच असतो. अशा परिस्थितीत तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने तणाव वाढतो. त्यामुळे मन उदास राहते. त्यामुळे आपण नियमितपणे ध्यान करणे आवश्यक आहे. तणाव दूर होतो. नियमितपणे दररोज सकाळी योगा करण्याचा देखील प्रयत्न करा. यामुळे दिवसभर उत्साही राहम्यास मदत होते.

निरोगी आहार

अधिक हलके आणि निरोगी पदार्थ आपल्या आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश होतो, हंगामी फळे आणि भाज्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त समावेश करा. या काळात तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवते. तसेच बाहेरील अन्न खाणे देखील बंद करा.

ब्रेक घ्या

काम करत असताना दर दोन तासांनी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्या. तसेच कामाच्या नादामध्ये जेवण आणि नाश्ता करायला अजिबात विसरू नका. नाश्ता आणि जेवणाचा एक फिक्स वेळ ठरवा. काम वेळेवर पूर्ण करा, रात्री उशिरापर्यंत काम केल्याने आपले संपूर्ण शेड्यूल बिघडते. त्यामुळे याचा झोपेवरही परिणाम होतो. यामुळे घरून काम करताना या गोष्टी लक्षात ठेवा.