
सध्याचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव, डिप्रेशन, बदलते हवामान, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या निर्माण होताना दिसते. आजकाल तर फक्त ज्येष्ठ लोकांनाच नाही तर तरुण मुला-मुलींना देखील डायबिटीस होताना दिसत आहे. तसेच डायबिटीस झाल्यानंतर शरीराची योग्य काळजी घेणे देखील गरजेच आहे. योग्य आहार घेणे, वेळेत औषध घेणे अनेक गोष्टी पाहणे गरजेचे आहे. कारण मधुमेह झाल्यानंतर शरीराची नीट काळजी घेतली नाही तर अनेक वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता असते.
1. जर तुम्हालाही डायबिटीसची समस्या असेल तर दररोज सकाळी व्यायाम किंवा योगा करणे गरजेचे आहे योगा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
2. डायबिटीज असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात लोह मिळण्यास मदत होते त्यामुळे असे पदार्थ खाणं खूप गरजेचे आहे.
3. ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे अशा लोकांनी दिवसातून एकदा तरी ग्रीन टीचे सेवन करणे गरजेचे आहे. ग्रीन टी शरीरासाठी खूप फायदेशीर असते कारण ग्रीन टीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे आपली शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करतात. त्यामुळे डायबेटीच्या पेशंटने ग्रीन टी चे सेवन एकदा तरी केलेच पाहिजे.
4. डायबिटीज असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा आणि अन्य पौष्टिक भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. मग मटार, कारले, पालक, मेथी, शेपू, शेवगा अशा अनेक भाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे.
5. ज्या लोकांना डायबिटीसची समस्या आहे अशा लोकांनी धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावं. धुम्रपान आणि मद्यपान हे शरीरासाठी घातक असते त्यामुळे डायबिटीसच असलेल्या लोकांनी व्यसन करणे टाळावे.
6. तुम्हाला जर डायबिटीजचा त्रास असेल तर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालणं खूप आवश्यक आहे. चालल्यामुळे आपली शुगर नियंत्रण नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे नियमित चालणे गरजेचे आहे.
7. डायबिटीसची समस्या तुम्हालाही असेल तर फुटाणे, बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे अशा बेदाण्यांचा आहारात समावेश केला पाहिजे.